दरवर्षी सालाबादप्रमाणे मार्च महिन्याचा तिसरा मंगळवार हा जागतिक सामाजिक कार्य दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो.व त्यानुसार या २०२३ या वर्षाच्या दि २१ मार्च रोजी साजरा केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते व त्याचे सामाजिक कार्याचे योगदान आणि त्यांच्या यशासाठी प्रयत्न तसेच त्यांचे परिश्रम हे साजरे करण्यासाठी व समाजामध्ये सामाजिक कार्य करण्याची जागरूकता निर्माण व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो .समाजातील सर्व स्तरातील समूहातील लोकांनी एकत्र येवून कार्य करावे व समाजाची प्रगती करावी हा एक उद्देश असतो.
सामाजिक कार्यकर्ते हे सामाजिक न्याय ,सामाजिक विकास ,आणि मानवी हक्कांसाठी तसेच समुदायांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्य करतात.
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर्स या दिवसाचा प्रचार करण्याचा हे फेडरेशन कार्य करत .जागतिक स्तरावर नॅशनल असोसिएशन ऑफ सोशल वर्कर्स हि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सर्वात मोठी सदस्यता असलेली संस्था आहे.हि संस्था तिच्या सदस्यांच्या व्यावसायिक वाढीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते.आणि सामाजिक कार्यकर्तांसाठी व्यावसायिक मानके तयार करते.आणि देखरेख देखील करते.तसेच कामकाजासाठी योग्य धोरणे विकसित करते.
जागतिक सामाजिक कार्य दिवस २०२३ या वर्षाची थीम आहे “संयुक्त सामाजिक कृतीद्वारे सामाजिक विविधतेच आदर करणे “( Respecting Diversity Through Joint Social Action ) याचा अर्थ असा होतो कि स्थानिक पातळीवर बदल हे तेथील योग्य नेतृत्व आणि विविध सामुदायांद्वारे होत असतात .आणि या दोन गोष्टींवर समुदायांची प्रगती आणि परिवर्तन होत असते.
जागितक सामाजिक कार्य दिवस हा जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो .आणि साजरा करण्यासाठीचा महत्वाचा उद्देश म्हणजे मानव कल्याण तसेच सामाजिक प्रगती व समाज हितासाठी ,हक्कासाठी मार्गदर्शन करणे हा होय.सामाजिक कार्य कसे करायचे ह्याबद्दल माहिती लोकांना कळावी हे पण एक उदिष्ट असते.
हा दिवस पुढीलप्रमाणे हि आपण साजरे करू शकता …
१) योगदान देणे – ह्या दिवशी तुम्ही संकल्प करू शकता कि वर्तमान व भविष्यकाळात समाजसेवा करण्याबाबत आणि त्यातून समाजाची प्रगती करु शकता .
२) कार्यशाळा व मेळावे घेऊ शकता – ह्या दिशी विद्यार्थी ,सामाजिक संस्था ,वाड्या वस्ती येथे जनजागृतीसाठी मेळावे आयोजित करू शकता .
३) सोशल मिडिया वर जनजागृती करणे – समाज कार्य दिन घोषवाक्यानुसार आपण सोशल मिडिया अकौन्टवर व्हिडीओ बनवून पोस्ट करू शकता .. ब्लॉग्स,लेख लिहू शकता.
४) सामाजिक संस्था भेट – आपल्या नजीकच्या सामाजिक संस्था येथे सामाजिक कार्य करून हा दिवस साजरा करू शकता .
व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते बनण्यासाठी लागणारी शेक्षणिक अहर्ता – व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते हे सामाजिक शिक्षण घेतलेले पदवीधारक ,पदव्युत्तर ,व डॉक्टरेट पदवी धारण केलेला असतो.तो समाजात कसे कामकाज करावयाचे ह्याचे प्रशिक्षण घेतलेले असतात.हा पदवीधारक शासकीय व निमशासकीय संस्था येथे नोकरी करतो त्याला नियमानुसार वेतन मिळते.सध्या असे दिसून येत आहे कि व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते यांना जगभरातून मागणी आहे.शासकीय व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते हा शासनाच्या धोरणांची व योजनांची अंमलबजावणी राबविण्याचे कामकाज करतात. ह्या आपल्या कार्यातून तो समाज कल्याण व प्रगती करण्यासाठी कामकाज करत असतो.
व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते हे केंद्र व राज्य सरकारी विविध विभागात म्हणजेच आदिवासी विभाग ,आरोग्य विभाग,कौटू बिक न्यायालय ,समाज कल्याण विभाग ,जिल्हा परिषद ,इत्यादी शासकीय कार्यालय येथे नोकरी करतात. तसेच सामाजिक संस्था येथे पण काम करतात ,
·सामाजिक कार्यकर्ते हे समाज घडवण्याचे कामकाज करतात.आपल्या कार्यातून ते समाजासाठी सतत कामकाज करत आपले उद्दिष्ट आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी कार्य करत असतात.हे कार्यकर्ते कोणत्याही प्रसिद्धी ,मानधनाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेने कार्य करत असतात.सामाजिक कार्यकर्ते हे आपल्या आवडीनुसार च्या क्षेत्रात सामाजिक कार्य करतात .शिक्षण ,आरोग्य,कौटूबिक पुनर्वसन,महामारी,भूकंप,व्यसनमुक्ती वैगेरे क्षेत्रात कार्य करताना असे सामजिक कार्यकर्ते दिसून येतात..
छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छ. शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,विनोबा भावे, बाबा आमटे,मेघा पाटकर ,सिंधुताई सपकाळ ,डॉ अभय बंग इत्यादी मान्यवर हे आपले आदर्श आहेत .ज्यांनी समाज कल्याण व उद्धारासाठी आपल संपूर्ण जीवन पणाला लावलं.ह्या थोर पुरुषांनी व महिलांनी व्यक्तीला स्वतंत्र विचार करायला शिकवलं व आपले हक्क आपणच मिळवायचे त्यासाठी लढा द्यावा लागला तरी चालेल ह्याबाबत संघर्ष केला आणि इतिहासाच्या पानावर आपल्या कार्याची सोनेरी अक्षरात नोंद केली व एक विचार दिला कि आपल्याला निस्वार्थी भावनेणे केलेले सामाजिक कार्य म्हणजेच समाजाची व देशाची प्रगती होय.
जाता जाता मी इतकच अभिमानाने सांगू इच्छिते कि मी एक व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता असून मी सर्व थोर व्यक्ती व समाजसेवा कार्यकर्ते व अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानते.कारण आपण सार्वजन एका वेळी एक समुदात, अधिक न्याय आणि सर्व समावेशक जग निर्माण करण्यात आपली महत्वाची भूमिका दिसते ..होऊ मी एक सामाजिक कार्यकर्ती ,मनोविकृती सामाजिक कार्यकर्ती ,व समाज सेवा अधिक्षक ….मला आभिमान आहे ह्या पदाचा …
माझी ओळख –
सौ रोहिणी भोसले –शेख
You cannot copy content of this page
3 Comments
Good article
Nice
You have explained the importance of social work day and other related aspects very lucidly.
Congratulations 🎉