आज जागतिक स्किझोफ्रेनिया (schizophrenia)दिवस जगभरात साजरा केला जात आहे .लोकांना या आजाराबाबत माहिती मिळावी व ह्या आजाराबाबत उपचार लवकर सुरु केल्यास हा आजार आटोक्यात येऊ शकतो. सर्वसामान्य लोकांना या आजाराबाबत कुतुहल व शंका असते या उद्देशाने जगभरात हा दिवस साजरा केला जातो. या आजाराबाबत प्रचार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आजाराशी निगडीत एक थीम देत असतेत्याप्रमाणे या वर्षीची थीम आहे “ Celebrating the power of community kindness “ म्हणजेच ” स्किझोफ्रेनिया बाबत समाजात सदभावनेची शक्ती साजरी करूयात “.
स्किझोफ्रेनिया या आजाराबाबत सोप्या भाषेत माहिती देण्याचा हा एक माझा प्रयत्न ….
स्किझोफ्रेनिया यालाच मराठी मध्ये छिन्नमनस्कता असे म्हटले जाते किवा दुभंगलेले मन अशी हि स्किझोफ्रेनिया ची ओळख आहे.हा एक गंभीर मानसिक आजार आहे. भास व भ्रम तसेच मनाचा विचारांचा गोंधळ होणे व वर्तनांत बदल होणे हे या विकृतीचे मुख्य लक्षण आहेत .या आजाराची सुरुवात युवा अवस्थेत होऊ शकते.लवकर उपचार घेतले तर नक्कीच हा आजार आटोक्यात राहू शकतो.रुग्ण हा सर्वसामान्य लोकांप्रमाणे आपले जीवन व्यतीत करू शकतो. स्किझोफ्रेनिया आजाराला असे नाव का पडले तर संशोधक सांगतात कि ग्रीक भाषेमध्ये स्कीझीन म्हणजे दुभंगलेले मन आणि फ्रेन म्हणजे मन असा ह्या आजाराच्या दोन शब्दावरून स्किझोफ्रेनिया असे नाव पडले . स्किझोफ्रेनिया हा शब्द प्रथम युजेन ब्ल्यूलर या प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ यांनी प्रथम वापरला म्हणून यांना स्किझोफ्रेनिया या आजाराचे जनक म्हणतात .
मानसोपचारतज्ज्ञ (Physiologist) यांच्या मते ह्या आजार होण्याची कारणे असंख्य आहेत. अनुवंशिकता, मेंदूमध्ये होणारे रासायनिक बदल,कौटुंबिक समस्या,स्पर्धात्मक आयुष्य,व्यसनांमुळे इत्यादी अनेक कारणे आहेत जि स्किझोफ्रेनिया या आजाराला कारणीभूत आहेत.
या विकृतीमध्ये पुढीलप्रमाणे प्रमुख लक्षणे आढळतात ….
इत्यादी महत्वाची व माहित असलेली लक्षणे दिसून येतात ..
स्किझोफ्रेनिया या आजाराला जितक्या लवकर ओळखता येईल तितक्या लवकर रुग्ण बरे होतात.त्यासाठी औषधोपचार सुरु करणे गरजेचे असते. अश्या रुग्णांना पुढील प्रमाणे उपचार केले जातात. आजारची तीव्रता पाहून डॉक्टर रुग्णांस बाह्यरुग्ण विभाग किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार देतात ..
याच बरोबर रुग्ण व नातेवाईक यांनी इच्छाशक्ती असणे जरुरी आहे.वेळोवेळी उपचारास हजर राहणे हि तितकेच महत्वाचे आहे.दररोज रुग्णांना औषधे देणे गरजेचे आहे.त्याचबरोबर प्राणायम ,योगा ,शारीरक व्यायाम,छोटी छोटी कामे देणे तसेच रुग्णांनी आपले छंद जोपासणे हि महत्वाचे आहे .
कोणत्याही आजाराला उपचार हे असतातच … आणि ह्यासाठी दृढनिश्चय हि तितकाच महत्वाचा असतो.सरकारी रूग्णालय ,खाजगी रुग्णालय,पुनर्वसन केंद्र येथे स्किझोफ्रेनिया या आजारावर उपचार घेऊ शकतात.आपल्या वागण्यात विचारात बदल जाणवल्यास त्वरित आपल्या नातेवाईक ,मित्रपरिवार यांना जरूर सांगावे किंवा नातेवाईक –मित्रपरिवार यांना जर बदल जाणवल्यास त्वरित उपचार सुरु करावेत.
जाता जाता अतुल कुलकर्णी यांनी अभिनय केलेल्या देवराई या सिनेमातील कवितेच्या चार ओळी खास अश्या रुग्णांना व नातेवाईक यांना समर्पित…
नाही हाकारा, पण उठले रान
घरटे सापडेना वाट
बेभान पाखरू, समजेना कोणा
का कल्लोळ कल्लोळ …..
सौ रोहिणी भोसले –शेख
You cannot copy content of this page
23 Comments
Very excellent topic and informative.
Thank you
Nice information…
Thank you
Khup chan madam
Thank you
मुद्देसूद मांडणी केली आहे
Very nice information & easily good topic symptoms treatment social support
Thank you
खूप छान माहिती मिळाली
असे विषय लोकापर्यंत पोहोचण्याची खूप गरज आहे
थँक्स रोहिणी👌👍🙏🌹
Thank you
Very nice information 👌
Keep it up 👍
Thank you
Nice information
Thank you
Ekdam Sundar, khup mast 👍👌👌
Thank you
Nice information
Thank you
Great share👍🏻
Thank you
Nice information
Thank you