१० ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणुन साजरा केला जातो.मानसिक आजार व आरोग्य त्याबाबतचे उपचार ,निर्माण होणारे विविध प्रश्न यासाठी समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य संघटना आरोग्य विषयक विविध आजाराबाबत माहिती देण्याचे काम करते हे आपण सर्वच जण जाणत आहात.व या संघटनेकडून दरवर्षी मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक घोष वाक्य प्रसिद्ध केल जाते .ह्या घोषवाक्यानुसार त्या त्या क्षेत्रातील अथवा विभागातील कार्य करणारे व्यक्ति आजाराबाबत माहिती व मार्गदर्शन प्रसारित करण्याचे काम करीत असतात. सालाबाद प्रमाणे या वर्षीचे घोषवाक्य आहे “ कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.” सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य …
जागतिक आरोग्य संघटना यांनी मानसिक आरोग्य आणि काम यांच्यातील महत्वाच्या संबधावर लक्ष केन्द्रित करण्यासाठी हे घोषवाक्य यावर्षी जाहिर केल आहे.सुरक्षित ,निरोगी,कामाचे वातावरण हे मानसिक आरोग्यासाठी सरंक्षणात्मक घटक म्हणून काम करू शकते.कलंक ,भेदभाव आणि छळ त्यामुळे कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. साहजिकच कामाच्या ठिकाणी चिंता,ताण तणाव ,नैराश्य,निद्रानाश सारख्या इत्यादि मानसिक आजरांची सुरुवात होताना दिसून येत आहे.
जागितक लोकसंख्येपैकी ६० ते ७० % व्यक्ति कामावर असताना मानसिक आरोग्याला होणारे धोके टाळता येतात.आणि कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे .
आजचे जीवन हे स्पर्धेचे युग म्हटले जाते.व्यक्ति हा कमी वेळात प्रगति करण्यासाठी धावपळ करीत असतो.या शर्यतीत तो कामाच्या ठिकाणी भेदभाव,असूया ,द्वेष ,राजकारण इत्यादि गोष्टींचा सामना करत आपल काम प्रगतिपथावर नेण्याचे कार्य करीत असतो.पण हां प्रवास म्हणावा तितका सोपा नाही हे माहिती असुनही आपल्या जबाबदारया व् स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याची धावपळ ही सुरूच असते. आणि या धावपळ करण्यातच व्यक्तीला निद्रानाश,जेवणाच्या तक्रारी ,चिंता,नैराश्य इत्यादि प्रकारच्या आजराना सामोरे जावे लागते.अश्याप्रकारचे वातवरण खरतर कमीजास्त प्रमाणात सर्वांच्याच बाबतीत असते.पण आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे हे आपण दुर्लक्ष करतो व भविष्यात आजाराला स्वीकारन्याशिवाय पर्याय नसतो.
कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य ठीक नसल्यास मनोसामाजिक समस्या निर्माण होतात..जसे की
समाजात वावरताना ह्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले नाही,त्याचे काम सुटले,तो आता बेरोजगार आहे,तो व्यसनी आहे,वेडा आहे.अश्याप्रकारची चर्चा केली जाते व त्यामुळे तय व्यक्तीला तान तणाव याला सामोरे जावे लागते.
कामाच्या ठिकाणी सर्वांचेच मानसिक आरोग्य उत्तम रहावे म्हणून कार्यालय प्रशासन सहकारी आणि स्वतः यांची महत्वाची भूमिका आहे असे मला वाटते.पुढे नमूद केलेल्या मुद्यावर एक दृष्टिक्षेप टाकल्यास आपण आपल्या कार्यालय,कामाचे ठिकाणयेथे मानसिक आरोग्य चांगले ठेऊ शकतोहे समजेल.
मानसिक आरोग्य हे तेव्हाच उत्तम राहील जो एकमेकास समजुन घेईल.व व्यक्तिच्या अडचणीत त्याला मदत करेल.
सौ .रोहिणी भोसले –शेख
समाज सेवा अधिक्षक
प्रादेशिक मनोरुग्नालय,येरवडा, पुणे
You cannot copy content of this page
7 Comments
खूप छान माहिती आणि आजार होऊ नये या साठी काय काळजी घेतली पाहिजे ही माहिती पण छान आहे
Thank you
Very well mentioned ma’am.. Actually its Necessity to understand these all stuff now a days.. It’s always nice to read your all sections and helpful too.. God give you more n more strength to spread such positivity…
उत्तम फारच छान लिहलं आहे 👍
Very much informative, congratulations 🎉
मानसिक आरोग्य बाबत खूप छान लेख आहे
Khup chan mahiti aahe first Thank for this 🙏🏻 khup Saraya ghosti aplayla mahit astat pan velet apan Tay kade laksha det nahi. Mg taycha motha parnima hoto tumchay hay lekha mule khup sari mahiti bhetali kay karva kay karu naye konti kalji ghetali pahihe he kala Thank you 🙏🏻