आज दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात आहे .जगभरात आजचा महत्वाचा प्रश्न म्हणजे गंभीर आजार नव्याने निर्माण होणे .व त्याचबरोबर विविध आरोग्याविषयी समस्या निर्माण होणे. अश्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी व मार्ग देण्यासाठी दि ७ एप्रिल १९४८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली .( World Health Organisation ).संघटनेच्या स्थापनेनंतर दि ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली .
जगभरातील लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी . तसेच जगभरात नव्याने निर्माण होणारे आजार ह्याबाबत माहिती मिळावी .तसेच आरोग्यविषयक समस्यांबाबत चर्चा व्हावी. अश्या प्रकारचे विविध उपक्रम साजरे करत लोकांना मार्गदर्शन केले जाते.
वैद्यकीय क्षेत्रात आजच्या दिवसाला खूप महत्व आहे. आजच्या दिनी विविध रुग्णालय , सामाजिक संस्था,महाविद्यालय,येथे जनजागृतीपर कार्यकम आयोजित करून हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या कित्येक दशकांपासून जगातील गंभीर आजार आणि आरोग्य समस्या तसेच संकटे यांचा सामना करण्यासाठी अत्यंत महत्वाचे योगदान दिले आहे हे आपण जाणतो आहोत . जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एखादे घोषवाक्या नुसार साजरा करण्याचे सन १९९१ मध्ये ठरवले .व ह्या १९९१ व्या वर्षापासून एखाद्या थीमनुसार आरोग्य दिन साजरा केला जात आहे . वर्ष २०२३ या वर्षीच्या धोरणांनुसार जागतिक आरोग्य संघटनेने थीम ची घोषणा केली .व या वर्षीची थीम आहे Health For All म्हणजेच सर्वांसाठी आरोग्य …
दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी जागतिक आरोग्य संघटना ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे .या ७५ वर्षात जागतिक आरोग्य संघटनेने समुदाय कल्याणासाठी म्हणजेच मानवकल्याणासाठी अनेक महत्वाचे कार्य केली आहेत.याच बरोबर ज्या ज्या देशांमध्ये भूकबळी ,वैद्यकीय मदत ,महामारी इत्यादी संकटाना त्या देशांना सामोरे जाण्यासाठी विविध वस्तू ,औषधे ,आर्थिकदृष्ट्या मदत केली आहे.तसेच आर्थिक दृष्ट्या मागास व गंभीर आरोग्य समस्येने बाधित देशात विविध रुग्णालय उभी केली आहेत व मोफत औषधे यांचे वाटप केल आहे.जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे .
नुकतच आपण सर्वांनी कोरोना सारख्या भयंकर महामारीला सामोरे गेलो आहोत व अजूनही सामोरे काहीप्रमाणात का होईना जात आहोत .कोरोना महामारीच्या काळात आपण सर्वचजण लॉकडाऊन सारख्या प्रकाराला सामोरे गेलो आहोत .व तेव्हापासून आपली जीवनशैली नक्कीच बदललेली दिसत आहे. आरोग्याच्या तक्रारी ,अपुरी झोप,खाण्याच्या पदार्थांच्या प्रकारात बदल, मानसिक अशांती इत्यादी गोष्टीना आपण सामोरे जात आहोत .व ह्या समस्येला सामोरे जाण्यासाठी माझ्याकडून काही महत्वाच्या टिप्स मी मांडत आहे ..
१) आहारात बदल – शारीरिक वाढीसाठी सकस व पौष्टिक आहार सेवन करा व वेळेत .
२) योग व व्यायाम – आपल्या दिनचर्या मध्ये व्यायामाला जरूर शामिल करा कारण योगा व व्यायामाशिवाय पर्याय नाही.
३) पुरेशी झोप – साधारण आठ तास इतकी झोप होणे आरोग्यदृष्ट्या आवश्यक आहे .
४) संगीताची आवड ठेवा – झोपताना अथवा व्यायाम करताना तसेच चालताना धीम्यागतिचे संगीत जरूर ऐका कारण त्यामुळे मनशांती मिळते. ताण तणाव कमी होतो.
५) सामाजिक माध्यमांपासून दुरी ठेवा – व्हास्टअप ,फेसबुक, इंस्टाग्राम, युटूब, मोबाइल इत्यादी गोष्टीनपासून अंतर ठेवा .
६) कुटुंबाला वेळ द्या – कुटुंब व मित्र परिवार यांना वेळ द्या , त्यांच्या सोबत संवाद साधा .
७)आरोग्य तपासणी – आपली व कुटुंबातील इतर सदस्य यांची आरोग्य तपासणी वेळोवेळी करा
सौ रोहिणी भोसले -शेख
You cannot copy content of this page
3 Comments
Chan
नीटनेटकी माडणी व लेख माहितपूर्ण
छान लिहिले