स्वमग्नता म्हणजेच ऑटीझम .. तसेच सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे ऑटीझम म्हणजे एक मानसिक स्थिती ज्यामध्ये एखाद्या मुलाला इतर लोकांशी संवाद साधने तसेच नातेसंबंध जोडणे कठीण जाते .अश्या मुलांना मनोबौधिक विकासात अनेकदा अडथळे निर्माण होतात.या आजारास इंग्रजी मध्ये Autism Spectrum Disorder ( ASD) असे म्हणतात. स्वमग्नता असलेल्या मुलांची संख्या सध्या मोठ्याप्रमाणात वाढ होतांना दिसून येत आहे. आपल्या देशात एका पाहणीनुसार दर हजारामागे सरासरी सात मुले अशी संख्या आढळून येत आहे .साधारण एक ते तीन वर्षे वयातील मुलांमध्ये ऑटीझम ची लक्षणे दिसून येतात.एक उदाहरण द्यायचे म्हटले तर मुलांना नावाने जरी हाक मारली तरी त्यांना समजत नाही .
ऑटीझम जागरुकता दिवस हा २ एप्रिल या दिनी साजरा केला जातो. समाजात या आजाराबाबत जनजागृती व्हावी हा महत्वाचा उद्देश असतो .सन २०२३ या वर्षाची थीम आहे Transforming the narrative :- contributions at home, at work, in the arts and in policymaking . या घोषवाक्यानुसार समाजाने अश्या रुग्णांना स्वीकारावे व त्यांना पाठिबा देत त्यांची प्रगती करण्यास मदत करावे .
१) मुलांना हाक मारली तर प्रतिसाद ण देणे
२) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ण देणे .
३) आपण काय बोलत आहोत हे एकूण ण ऐकल्यासारखे करणे.
४) स्वमग्नता बाधित मुले दुसऱ्याच व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्यास
घाबरतात .
५) एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे .
६) अजिबात ण बोलणे,
७) वारंवार सूचना द्यावे लागणे .
८) इतर लोकांसोबत संवाद साधण्यास अडचणी निर्माण होणे
९) स्वमग्नता मुले हि एकटी राहण्यास प्राधान्य देतात.
१०)सामान्य मुलांपेक्षा तुलनेने ह्या मुलांचा विकास खूप मंद असतो.
ऑटीझम होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा आजार होण्यासाठी अनुवंशिकता आणि जेनेटिक घटक हे प्रमुख कारण असू शकते.तसेच कमी वजनाचे बाल , लवकर म्हणजेच वाढ पूर्ण होण्याआधीच बाळाचा जन्म होणे ,गरोदर स्त्रीचे वय जास्त असल्यास , मेंदूतील संसर्ग झाल्यास .अशी अनेक कारणे बाळाला ऑटीझम होण्यास कारणीभूत होऊ शकतात.
स्वमग्नता हा आजार फक्त औषधे घेऊन बरा होत नाही. उपचारामध्ये मुलांना स्वावलंबी होण्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो. तसेच या उपचारामध्ये आपण विविध थेरपीचाहि वापर करू शकतो.
त्या थेरपी कोणत्या :-
१) बिहेवियर थेरपी ( Behaviour Therapy )
2) Play Therapy
3) Speech and Language
४)शेक्षणिक आणि शाळा आधारित उपचार
५) पोषण थेरपी
६)व्यावसायिक थेरपी
७) औषधोपचार
८) समुपदेशन .
या सर्व उपचारपद्धती बरोबर डॉक्टरांबरोबर पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे .तसेच समाजतील सर्व स्तरातील व्यक्तींनी सुद्धा आपले कर्तव्य समजून अश्या मुलांना समजून घ्यायला पाहिजे असे मला वाटते .
सौ रोहिणी भोसले-शेख या विश्रणावाडी, पुणे येथील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट(Clinical Psychologist)आहेत. ती मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, विवाह समुपदेशक, सामाजिक सेवा पर्यवेक्षक, लेखक आणि ऑफलाइन आणि ऑनलाइन अतिथी व्याख्याता यासारख्या सेवा प्रदान करते. गेली 20 वर्षे त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. आत्तापर्यंत, तिने कुटुंब किंवा समुदायाद्वारे त्यांच्या समस्यांमधून अधिक लोकांचे समुपदेशन केले आहे आणि त्यांचे पुनर्वसन केले आहे.
A
सौ रोहिणी भोसले -शेख
You cannot copy content of this page
7 Comments
You have explained about the autism in a very simple language and in brief.
Thanks for your efforts and concern.
Congratulations Rohini 🎉
Very nice & simple language explained symptoms, treatment & therapy about the autism. Congrats Rohini madam
You have written very wonderful and flowy language.
खूप छान. लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिलेले आहे. Good work
खूप छान मॅडम बऱ्याच लोकांना याचा फायदा होऊ शकतो
खूप खूप छान माहिती मिळाली, सोप्या भाषेत आहे सगळ्यांना सहज समजेल.
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा रोहणी👍👋🌹
Khuach chhan information aahai agadi upayogi. Mastch