विवाह हा एक महत्वाचा संस्कार आहे. विवाह हा कोणत्याही धर्माचा असो यामध्ये दोन व्यक्ती,दोन परिवार यांचे मिलन व सहसबंध प्रस्थापित होत असतात.वंशवृद्धी आणि प्रजनन करणे, मातृपितृ ऋण फेडणे असे संस्कार आपल्यावर झालेले असतात.आणि त्यासाठी प्रत्येक धर्मामध्ये विवाह करणे हे बंधनकारक असते व त्यामध्ये काही वावगे आहे असे कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीला वाटत नाही.विवाहासाठी शारीरिक,मानसिक,सामाजिक,भावनिक अशी सर्वच प्रकारची सक्षमता असणे आवश्यक म्हटली जाते.
पूर्वीच्या काळी मुलीच लग्न करून देणे हि एक जबाबदारी आणि ग्रामीण भागात मुलीच्या सुरक्षिततेच्या बाबतीत काळजी असणे व त्यातून लहान वयात विवाह करून देणे व आपण जबाबदारीतून सुटलो असे म्हणत आई वडील आपल्या मुलांचे विवाह करून देत असत.आधुनिक काळात विवाह ठरविण्याच्या पद्धती तसेच विवाहाच्या पद्धतीत बदल झालेल्या दिसून येत आहे .प्री वेडिंग फोटो शूट ,संगीत, मेहंदी, थीम विवाह, डेस्टीनेशन वेडिंग , इत्यादी प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. स्त्री पुरुष समानतेचे युग आले आहे. शिक्षण,वय,हैसियत,करियर ,घर,बंगला,विभक्त कुटुंब इत्यादी गोष्टीबाबत विचार करताना युवावर्ग दिसून येत आहे.तरीपण असेही स्वातंत्र्य असले तरी आजपण “ कांदेपोहे” चा कार्यक्रम ठेऊन विचारविनिमय करून विवाह ठरविले जातात.
विवाह ठरतो ,बोलणी होतात व विवाह सोहळ्यास सुरुवात होते परंतु दोन्ही कुटुंबां कडून विवाह समारंभाची तयारी करत असताना जोडप्यांनी वैवाहिक जीवनाची योग्य तयारी करणेहि तितकेच महत्वाचे असते.परंतु आजहि पालक व जोडपी यांना वैवाहिक समुपदेशनाची आवश्यकता वाटत नाही.हे हि तितकच खरे आहे .विवाह सोहळ्यात मानपान ,रुसवेफुगवे ,नवीन जोडप्यांचा स्वभाव परिचय इत्यादी गोष्टी अपूर्ण असल्याने कधी कधी गैरसमज निर्माण होतात व त्यामुळे अनेक प्रश्न उद्भवतात व त्यासाठीच विवाहपूर्व समुपदेशनाची आवश्यकता असते.
मानसशास्त्रज्ञांच्या मते लग्न हा जीवनातील महत्वाचा निर्णायक बिंदू आहे .आणि विवाह नंतर सुरु होणारे नवविवाहित दाम्पत्याचे कुटुंबजीवन व त्यानंतर सुरु होणाऱ्या मानसिक, शारीरिक, सामाजिक बदलांची माहिती करून घेणे व जाणतेपणी तो निर्णय घेणे हे तितकेच महत्वाचे आहे.शिवाय सर्व धर्मियांच्या विवाहामध्ये “ लग्नानंतरच सर्व वेगळच असत “ हे सूत्र सर्वप्रकारे समानच असते.
विवाह पूर्व समुपदेशन म्हणजे विवाहाची तयारी करणे त्याबरोबरच एक जबाबदारी उचलणे होय.विवाहानंतर स्त्री पुरुष नाते हे समायोजनावर आधारित असते .खुपश्या गोष्टी ह्या नवीन असतात व त्यामुळे जोडप्यांना Adjust करावे लागते. व तसे करतना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून आजकाल बहुतांश जोडपी हे विवाह समुपदेशकाकडे जाऊन समुपदेशन घेण्याचा कल वाढत असलेला दिसून येत आहे.
विवाह झाल्यानंतर खुपदा असे पहावयास मिळते कि दोघांच्या आयुष्यात हि धावपळ सुरु असते.संसाराचा गाडा हाकत असताना नातेवाईक, मित्रपरिवार व आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करताना दोघांपैकी एकाची दमछाक होत असते व त्यामुळे ताणतणाव,वादविवाद,गैरसमज,घटस्फोट ,एकलकोंडेपणा इत्यादी गोष्टीना जोडप्यांना सामोरे जावे लागते.तेव्हा दोन व्यक्ती दोन परिवार यांनी आवर्जून एकमेकांस समजून घेतल्यास व एकमेकांच्या भावनाचा आदर केल्यास नक्कीच वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होणार नाहीत.
मला अश्या केसेस ना सामोरे जाताना पालकांच्या बाबतीत असे दिसून येते कि आम्ही नाही का सहन केल ? आम्ही नाही का संसार केला ? जबाबदारी अंगावर पडली कि सर्व काही ठीक होत .. वैगेरे वैगेरे असे विचार दिसून येतात.आणि काहीजण तर विवाहपूर्व समुपदेशनाची गरजच काय आहे.कशाला हि उठाठेव वैगेरे वैगेरे …
पण मला असे वाटते कि आजचे युग हे आधुनिक युग आहे आज सोशल मिडिया सारख्या गोष्टीना जास्त महत्व आलेलं आहे. त्यामुळे आज कुटुंबात सर्वजण आपल्या कामात व्यस्त असतात.त्यामुळे मुलांना सवांद साधण्यासाठी वेळ उपलब्द नसतो .व मुले सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपुरी माहिती गोळा करतात.त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यावर नक्कीच वाईट परिणाम होतो ब.तसेच नाती टिकवणे व विवाहाची जबाबदारी घेणे किती महत्वाचे आहे हे त्यांना कळणे महत्वाचे आहे असे मला वाटते.आजच्या धावपळीच्या जीवनमानात व स्पर्धेच्या युगात आपल्याल्या योग्य समजूतदार जोडीदाराची आवश्यकता नक्कीच लागते .त्यामुळे योग्य वयात लग्न व योग्य वयात मुलांना जन्म देण हे पण तितकच खर .आणि त्यासाठी भविष्यात उद्भवणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन होणे यशस्वीपणे नांदा सौख्य भरे आयुष्य जगण्यासाठी तितकेच गरजेचे आहे .
जाता जाता ..
विवाह एक संस्कार..
विवाह एक परंपरा ..
विवाह दोन कुटुंब एकत्र ..
नसावा अविचाराला थारा..
You cannot copy content of this page
22 Comments
Simple & sweet language…so we can easily understand…
This article is need of the day.
This would help to the young generation for their marriage preparation and performance.
Rohini, congratulations 🎉…
For the benefit of larger population you can publish it in the leading news papers.
Best wishes for your career…
Thank you
Must read blog by everyone
Nice article
Thank you
This article is very nice. All the best.
Thank you
This article is very nice.
Thank you
आताच्या नवदांपत्याना गरज आहे ,खूप सोप्या भाषेत तू लिहिले आहे.
Thank you
Very nice, kalachi garaj aahe pre marriage counseling, khup mast👌👌👌👌
Thank you
खूप छान आणि सोप्या भाषेत हे आर्टिकल लिहिले आहे, सध्याच्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाची खूप गरज आहे 👍
खूप छान रोहिणी, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा🌹🌹
खूप छान आणि सोप्या भाषेत हे आर्टिकल लिहिले आहे, सध्याच्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाची खूप गरज आहे 👍
खूप छान रोहिणी, खूप खूप अभिनंदन आणि
शुभेच्छा🌹🌹
सगळ्यांनी नक्की वाचा,प्रत्येक सोशल मीडियावर व्हायरल झाले पाहिजे👍
Thank you
Khup chhan important ani mahatvacha topic khar tar najuksuddha pan chhan article little aahai…….. Khupach chhan
Congratulations and All the best
Thank you
Khupch chan article.
Thank you
Nice and very important article. Thanku