बालपण देगा देवा ….
लहानपण देगा देवा ..
मुंगी साखरेचा रवा ….
संत तुकारामांच्या या ओळी आठवल्या कि नक्कीच आपण आपल्या बालपणात हरवतो आणि आठवतात त्या बालपणाच्या सर्व आठवणी ,तो खेळ,ती स्पर्धा ,मित्र परिवार ,शाळा अश्या असंख्य गोष्टी. खर म्हणजे बालपण हे सगळ्यांना सर्वाना हवेहवेसे वाटणारे . पण काही मुलांना आपले बालपण वेदनादायक व दुखदायक वाटणारे असू शकते. काही आठवणी या कटू असतात. व त्या नकोश्या अश्या वाटतात. काही मुलांच्या मनावर बालपणी जो काही आघात झालेला असतो त्याचे पडसात नक्कीच त्यांच्या युवा अवस्थेत अथवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर वाईटपणे असा पडू शकतो . मुले हि राष्ट्राची बहुमोल संपती आहे .देशाच्या विकासाचा व भावी काळातील प्रगतीचा पाया म्हणून या बहुमोल संपतीचा विचार करणे तसेच तिचे संवर्धन,जतन व विकास करणे या गोष्टींची नितांत गरज असल्याने मुलांचा योग्यप्रकारे विकास करण्यासाठी आणि त्यांचे योग्यप्रकारे पोषण करण्यासाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे . आजचा हा लेख अश्या विधीसंघर्ष ग्रस्त करत असलेल्या मुलांसाठी जिथे मी काम करत आहे व त्यांच्या अडचणी पाहत आहे. मानसिक ,सामाजिक,आर्थिक,शेक्षणिक समस्यांना त्यांना समोर जाताना मी अनुभवल आहे.. पाहिलं आहे…म्हणून ह्या लेखाद्वारे मी माहिती देण्याचा माझा एक प्रयत्न करत आहे …..
सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे मुलांकडून कायद्याचे उलंघन होणे जसे कि मालमत्तेचा नाश करणे ,अपहरण ,बलात्कार,चोरी,खून इत्यादी सारख्या अपराध मुलांकडून होणे होय .असे अपराध करणे म्हणजे ते एक प्रकारे कायदेशीररीत्या गुन्हा असतो..
साधारण वयाच्या १८ वर्षाखालील मुलाने केलेले गुन्हेगारी कृत्य बालगुन्हेगारीत मोडते.मात्र सध्या कायद्याच्या भाषेत यांना विधीसंघर्ष ग्रस्त बालक असे म्हटले जाते.विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक करता येत नाही.त्याला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवता येते.
दि .३१ डिसेंबर २०१५ रोजी बालकांचे काळजी आणि संरक्षण कायदा पारित झाला.जुवेनाईल व बालगुन्हेगार या शब्दाला असणाऱ्या नकारात्मक अर्थाच्या पलीकडे जाऊन बालके व अडचणीत आलेली बालके जि कायद्याने गुन्हेगार म्हणून ठरवलेली बालके यांच्याबाबत एकूणच बालकांची काळजी व संरक्षणाची जबाबदारी स्पष्ट करणारा हा कायदा अस्तित्वात आला.अनाथ,पळून आलेली ,भटकणारी,सोडून दिलेली,छोट्या मोठ्या गुन्ह्यात तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोप झालेली अश्या गोष्टींचा मुलांच्या भविष्याच्या अधिकारांच्या बाबतीत विचार करत ह्या कायद्यानुसार कामकाज केल जात.
मुलांकडून गुन्हा घडला अथवा अनाथ,भटकणारी मुले ज्यांचे वर्तन समाजविरोधी असते.अश्या मुलांना बाल कल्याण सामिती अथवा बाल न्यायालय यांच्या समोर सादर केले जाते.हे मंडळ १८ वर्षाच्या आतील मुलांच्या गुन्ह्याबाबत व समस्यांबाबत कमीत कमी काळात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले जाते.मा.बाल कल्याण मंडळ मुलांचे वय वर्ष सात ते अठरा वर्षाखालील मुले-मुली ज्यांनी गुन्हा केला आहे.अश्या बालकांविषयी निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार बाल न्याय मंडळास आहे.
देशात दिवसेंदिवस बालगुन्हेगारी वाढत आहे. आणि महाराष्ट्राचा यात देशात दुसरा क्रमांक लागतो.आणि नक्कीच त्यामुळे पोलीस व प्रशासनासमोर हि समस्या रोखणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे.बालगुन्हेगारीसाठी कौटुंबिक व आर्थिक सामाजिक परिस्थिती कारणीभूत असते.अश्या मुलांची संख्या हि झोपडपट्टी ,वाडी,वस्त्या येथे जास्त प्रमाणात दिसून येते.
इत्यादी महत्वाच्या कारणांमुळे मुले हि गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताना दिसत आहेत.
समाजात मुले हि गुन्हे करतात . व त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना प्रचंड मानसिक ताणाला सामोरे जाव लागत. पोलीस केस,तपासणी,बाल न्यायालय /मंडळ ,समोर उभे राहणे इत्यादी प्रक्रिया होत असताना मुलांच्या मनावर नक्कीच मानसिक परिणाम होत असतो आघात होत असतो. मुलाने गुन्हा कोणत्या मानसिक स्थितीत केला हे पाहणे पण तितकेच महत्वाचे आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीची बहुतांश मुले हि नैराश्य,व्यसनाधीनताच्या समस्येने ग्रासलेली असतात.बदललेल्या काळानुसार हल्ली पालक देखील आपल्या कामात अधिक व्यस्त असतात.त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो.आईबाबांचे प्रेम ,त्यांचे दुर्लक्षपणा यामुळे मुल त्यांच्यापासून दुरावले जातात.अश्यावेळी हे मुल नैराश्याने ग्रासलेल असत.परंतु लहान मुलांना पण नैराश्य येऊ शकते हे बहुतेक लोकांना माहिती नसते किवा मान्य करायला तयार नसतात.मुल सतत एकटे व उदास राहते.कमी बोलणे,विनाकारण चिडचिड व रागराग करणे,झोप कमी,खाण कमी,अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यात अडचण ,वारंवार डोकेडूखी,व पोटदुखीची तक्रार इत्यादी लक्षणे मुलांमध्ये दिसून आली कि पालकांनी वेळेत सावध राहावे.
काही विधीसंघर्ष ग्रस्त मुले हि नकळतपणे गुन्हा करून जातात किंवा जवळच्या व्यक्तीने धोका दिला त्यामुळे मी त्याला सोडणार नाही.अशी धारणा ठेऊन गुन्हा करणे त्यामुळे सुद्धा मुलांना नैराश्याला सामोरे जावे लागते.
सध्या अस्तित्वात असलेल्या मुलांबाबत कायद्याचा आढावा घेतला असता असे दिसून येते की, सामाजिक गैरव्यवस्थेमुळे परिणाम झालेली अपराधी किंवा दुर्लक्षित मुले यांच्याकडे बरेच लक्ष पुरविणे आवश्यक आहे.तसेच देशाच्या सामाजिक,सांस्कृतिक व आर्थिक परिस्थितीच्या सर्व बाजूंवर कार्यवाही करू शकेल अशी संपूर्ण देशासाठी एकरूप अशी एक बालक न्याय-व्यवस्था असणे आवश्यक आहे.त्यासाठी शासकीय, निमशासकीय संस्था यांनी पुढाकार घेऊन अश्या मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करावे.
वाढती बालगुन्हेगारी रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथक स्थापन करण्यात आले आहेत. कारण बालकांना न घाबरता घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती देऊ शकेल .व त्याला आपल्या भावना पद्धतशीर पणे व्यक्त करता येईल.
जाता जाता …..
मी वाचलेल्या कवितेच्या काही ओळी मुलांसाठी ….
आनंदाने जग रे तू
नको होऊस तू अर्धा
छंद तुझे नको गाडूस
नको ती जीवघेणी स्पर्धा
वेड्या प्राण तुझे
येतील तुझ्या घस्याशी
क्षमतेचे ठेव भान
तुझी स्पर्धा आहे फक्त तुझ्याशी …
You cannot copy content of this page
8 Comments
Nice 👍
Thank you
Nice article
Thank you
Very informative 👍
👍Very informative
Thank you
Thank you