“ संबधातून अस्तित्व निर्माण होते “, होय मानवी अस्तित्वाची हि खुणगाठ आहे .काही संबध मात्र आपण जन्माबरोबर घेवून येतो .उदा :- आई –वडील ,भाऊ – बहिण ,मामा ,काका,आजी –आजोबा इत्यादी.या नात्यांना आपण रक्तसंबधाची नातेसंबध म्हणतो.या नात्यांना करण्याची आपल्याला स्वातंत्र्य नसत.पण मित्र, मैत्रिणी, गुरु,शिक्षक,पती पत्नी ,सहकारी,हि नाती बिनरक्ताची पण आपण निवडलेली असतात.
नातेसंबधाबाबत माझे मत व्यक्त करताना मला असे वाटते कि ,आयुष्याची वाटचाल करताना आपल्याला प्रत्येकास रक्ताची असो वा मानलेली नाती अश्या नातेसंबधाची आवश्यकता असते .कुटुंबात समाजात आपण वावरताना सतत आपल्याला मानसिक आधाराची गरज असते.पाठिबा अश्या नातेसंबधातून मिळत असतो.
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो .तो साधारण चिडखोर ,समजूतदार ,विनोदबुद्धी ,हुशार ,चंचल इत्यादी स्वभाव प्रकारामध्ये मोडत असतो.त्यामुळे आपण पाहतो कि सर्वांनाच नातेसंबध टिकवता येतीलच असे नाही. पण व्यक्ती प्रयत्न करत असतो कि हि सर्व नातेसंबध टिकवत आपल्या आयुष्याचा प्रवास सुरु ठेवण्याचा . पण काही कारणास्तव नातेसंबध बिघडण्यास अशी काही कारण आयुष्यात येतात कि त्यामुळे नाते संपवण्यापर्यंत आपण निर्णय घेतो .व तेथून घर ,परिवार ,कार्यालय येथील वातावरण बदलून जाते व त्याचा परिणाम निश्चितच आपल्या मानसिक आरोग्यावर होतो .
नातेसंबध बिघडण्याची कारणे कोणती?
मानव हा सामाजिक प्राणी आहे . त्याला जगण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी त्यास त्याच्या सभोवतालच्या लोकांबरोबर जुळवून घेणे आवश्यक आहे .कौटुंबिक नातेसंबधापासून ,मैत्री,ओळखी आणि प्रेमसंबध हे सर्व जीवनात कधी न कधी महत्वाचे असते .म्हणूनच नाते टिकवणे हि आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पण प्रत्येकाच्या आयुष्यात अश्या काही घटना घडतात कि आपले असलेले नातेवाईक ,मित्रपरिवार, सहकारी यांच्याबरोबरचे नातेसंबध बिघडू लागतात . पुढीलप्रमाणे घटनांना सामोरे जाताना व्यक्तीचे नातेसंबध बिघडतात …
पैसा व संपती :- व्यक्तीला अन्न ,वस्त्र ,निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करताना पैसा हा आवश्यक असतो .व हा पैसा कमवण्यासाठी व्यक्तीला असंख्य संकटाना सामोरे जावे लागते.पैसा कमवण्यासाठी कष्टा शिवाय पर्याय नसतो पण इतक करूनही व्यक्ती समाधानी नसतो .वडिलोपार्जित संपती व स्वकष्टाने मिळवलेली संपती व्यक्तीच्या आयुष्याचा महत्वाचा भाग असतो.पण हीच संपती नातेसंबध बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते. वडिलोपार्जित संपती हि पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होती असते .पण ह्या प्रकीयेमध्ये जर ह्या प्रक्रियेस असमानता झाल्यास तर नक्कीच नातेसंबधात फुट पडू लागते ,दरार निर्माण होत जाते.ज्या व्यक्तीचा हक्क डावलून दुसऱ्यास हक्क दिला अथवा हस्तांतरित संपती केल्यास ती व्यक्ती नाराज होते व सुडाची भावना ,द्वेष ,असूया सारख्या भावनांची निर्मिती होते व नातेसंबधात दरार निर्माण होते.
स्पर्धा :- कुटुंबात व समाजात नातेसंबंध कोणतेही असो आपापसात स्पर्धा हि होतच असते .नाते जपण्यासाठी असो वा नात्यांपेक्षा श्रेष्ठ होण्यासाठी असो स्पर्धा हि होताच असते.कुटुंबात व समाजात आपली अनेक नाती असतात ती रक्ताची असो वा मानलेली यामध्ये समाज गैरसमज व स्पर्धा नसावी .त्यामध्ये वाद विवाद नसावा .असे झाल्यास नक्कीच व्यकी मानसिकरीत्या अस्वस्थ होतो व त्याच्या दैनदिनी व्यवहारावर परिणाम होतो .
गैरसमज :- गैरसमज हा सर्वांच्या परिचयाचा शब्द पण हाच शब्द नातेसंबध बिघडवण्यास कारणीभूत ठरतो.नाते कोणतेही असो असा एक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जेव्हा गैरसमजातून नात्यांमध्ये दरार निर्माण होते .गैरसमज हा आपण चुकीच्या पद्धतीने लावलेला एक तर्क असतो.व त्यामधूनच अबोला निर्माण होतो व नातेसंबध बिघडण्यास कारणीभूत ठरतो.
अहंकार :- प्रत्येक व्यक्तीमधील व्याक्तीमत्वाचाच एक प्रमुख भाग असतो तो म्हणजे अहंकार .ज्याठिकाणी अहंकार जितका मोठा असतो तिथे आपल्याला बिघडलेले नातेसंबध आढळतात.अहंकारापेक्षा नातेसंबंध यांना आयुष्यात महत्व देवू नये.जिथे नात्यांना जपण्यासाठी माघार घ्यावी लागली तर आपण जरूर घ्यावी .पण आपला अहंकार कुरवाळत बसू नये .
अश्या प्रकारे आपण कुटुंबात ,समाजात ,कार्यालयात नाते संबध ह्या कारणाने बिघडताना आपण पाहत असतो
निरोगी नातेसंबध व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी घ्यावयाची काळजी :-
प्रत्येक नातेसबंध हा अत्यंत नाजूक आणि निभावण्यासाठी कठीण असतात .त्याला सामंजस्याची फुंकर घालून नक्कीच आपण निरोगी बनवू शकतो.त्यासाठी व्यक्तीस खूप मेहनत,त्याग,समर्पण आणि परस्परांवर विश्वास आवश्यक असतो.संशोधनात असे दिसून आले आहे कि निरोगी नातेसंबध असल्यास व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते.
निरोगी नातेसंबध टिकवण्यासाठी काही टिप्स:-
एकमेकांच्या मतांना आदर दया –नात्यांमध्ये नक्कीच आपल्या मतांचा विचार करावयास हवे पण त्याचबरोबर समोरच्याचे म्हणणे एकणे व त्यांच्या मताला मानून आदर देणेही तितकेच महत्वाचे आहे.त्यामुळे गैरसमज होणार नाहीत ,मत मोकळेपणाने मांडले जाईल व समोरील समस्या मिळून सोडवली जाईल.
नात्यांमध्ये एकमेकांना अंतर ( space) दया – नात्यांमध्ये विश्वास हा महत्वाचा असतो. तसेच दोघांमध्ये अंतर हि तितकेच महत्वाचे आहे .कारण दोन व्यक्ती सारखे नसतात.तसेच त्यांचे विचारही सारखे नसू शकतात तेव्हा नाते टिकवण्यासाठी थोडे अंतर ठेवावे .कि जेणेकरून योग्य वेळ ठरवते बरोबर काय व चुकीचे काय असे मला वाटते.त्याबरोबरच समोरील व्यक्तीस थोडा वेळ मिळतो परस्थिती समजून घेण्यासाठी .
कौतुक करा तसेच शाबासकी दया – नात कोणतेही असो त्या नात्यामध्ये आपल्या मुलांना,सहकारी वर्गाला , मित्र मैत्रीण ,यांनी मिळवलेल्या यशासाठी नक्कीच शाबासकी दया अथवा कौतुक करा मग पहा नाते कसे अजून उमलते .
क्षमा करायाल शिका – व्यक्ती हा सर्वगुणसंपन्न नसतो. तो शिकतच आपली प्रगती करत असतो. आपल्या लोकांकडून काही चुका झाल्यास तुम्ही त्यांना माफ करा व समजावून सांगा कि कुठे चुकल .तसेच क्षमा करा व आयुष्याची पुढील वाटचाल मिळून सुरु ठेवा.तुम्ही समोरच्यास माफ केल्यास नक्कीच तुमचे मन मोकळे होईल व एक प्रकारचे दडपण राहणार नाही व आयुष्यात आनंदी निरोगी मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळेल.
जाता जाता इतकच मी वाचेलेली एक प्रसिद्ध ओळी येथे व्यक्त करेन …
40 Comments
What a beautiful blog.. very nice, everyone should think about this and behave accordingly.. very nice ma’am 💞💞
Thank you
खुप छान
Thank you
खुप छान
Very good blog madam..
Nice
Thank you
Thank you
Nice
Thank you
Thank you
उत्तम मांडणी, सुंदर लेखन
Thank you
Nate sambhav ya vishayavar khup chhan lekh aahai aplya baryach prashnachi uttare milatat khup chhan
Thank you
This is the best Article I haven’t read in my life
Thank you
Must read blog my every person 👍👍
Must read blog by every person.
Thank you
Khup chan
खरचं खुप छान माहिती दिली, आजच्या युगात नाते संबंधात खुप समस्या आहे त्या साठी मानसिक आरोग्य खुप महत्वाचे आहे.
Thank you
अतिउत्तम
Very nice..
Very awesome
Thank you mam
Thank you..
अतिउत्तम खूप छान
Thank you
Very well written madam, this is a must read blog for every person
Thank you
फारच आवडला लेख आपणांस पुढील लेखनासाठी शुभेच्छा
Thank you
Nice and informative article dear Rohini ji keep it up
Thank you very much
Good
Congratulations 🎉
Thank you very much Resp.Sir
खूपच छान लेख
Really good one