विवाह हा एक संस्कार आहे.विवाह कोणत्याही धर्माचा असो तो एक सामाजिक बंधन आहे. विवाहामुळे दोन व्यक्ती व त्याचबरोबर दोन कुटुंबे एकत्र येतात.दोन व्यक्तींचा मिळून विवाह होतो.व संसाराचा गाडा चालत असताना कधी कधी समजून घेण्यात अडचणी निर्माण होतात.व समज-गैरसमज यातून घटस्फोट(Divorce) होतो.
घटस्फोट म्हणजे पती-पत्नी यांचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबध कायदेशीररीत्या तोडणे होय.विविध धर्माच्या कायद्यानुसार जसे विवाह होतात तसेच घटस्फोट पण विविध धर्माच्या कायद्यानुसार होतात.
घटस्फोट होण्यामागची कारणे :-
घटस्फोट घेण हा कुणासाठीच आनंदाचा निर्णय नसतो.त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुखवल जात.तसेच अख्ख कुटुंब उध्वस्त होऊ शकत. पती-पत्नीस जर मुले असतील तर या घटस्फोटामुळे त्यांच्या मनावर नक्कीच परिणाम होतो.त्यांना आपले आईबाबा वेगळे होतात हे पचनीच पडत नाही.त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे मुले चिडचिड किंवा हट्टी बनतात,एकलकोंडी होतात त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची एक समस्या बनते.
पती-पत्नीच्या एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा – यामध्ये साधारण आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा या अवास्तव असतात. आपल्या जोडीदाराने आपल्या मर्जीप्रमाणेच वागावे व त्याने मला न विचारता कोणताही निर्णय घेऊ नये.इत्यादी प्रकारच्या सामाजिक,आर्थिक,कौटुंबिक प्रश्नांबाबत फक्त आणि फक्त माझेच एकले पाहिजे. अशी अवास्तव अपेक्षा असणे हे एक कारण असू शकते .
एकतर्फी निर्णय घेणे – कुटुंबात किवा आयुष्यात कोणताही महत्वाचा निर्णय घ्यावयाचा असेल तर जोडीदाराला विश्वासात न घेणे त्यांच्या मताला महत्व न देणे व आपल्या जोडीदाराला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत राहणे.अश्या स्वभावामुळे दुसऱ्या जोडीदाराची घुसमट होते.व त्याचे कालांतराने परिणाम विभक्त होण्याने होते.
पती-पत्नी मध्ये समजूतदारपणाचा अभाव – विवाहामुळे दोन व्यक्ती एकमेकांसोबत जोडले जातात.त्यांच्या विचारात जरी मतभेद असले तरी विवाह हि एक जबाबदारी आहे आणि आपण ती निभावली पाहिजे या हेतूने पती-पत्नी समजुतीने वागतात.पण काही जोडप्यांमध्ये अहंकार,अभिमान फार मोठा असतो.त्यामुळे समजूतदारपणा न दाखवता घरामध्ये वादविवाद होतात.
जोडप्यांमध्ये शारीरिक गरजा पूर्ण न होणे- विवाह हा एक जसा संस्कार आहे.तसाच शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी विवाह हे एक वंशवृद्धीसाठीचे समाजमान्य बंधन आहे.पती-पत्नीच्या शारीरक गरजा पूर्ण करताना काही अडचणी वा प्रश्न उपस्थित झाल्यास जोडपी एकमेकांस आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात करतात.यामंध्ये दोघांपैकी एकाची मानसिकता न पाहता शारीरिक संबध ठेवणे हा एक हक्क आहे व तो मला मिळालाच पाहिजे अशी वृत्ती,प्रकुत्ती निर्माण होते.त्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होते व संवाद कमी होतो.
जोडप्यांपैकी एक मानसिक रुग्ण असणे – आपल्या कायद्यानुसार जर आपला जोडीदार आपल्या कर्तव्याप्रती आपली जबाबदारी पूर्ण करण्यास सक्षम नसल्यास त्यांना घटस्फोट घेता येतो तसेच दोघांपैकी एक मानसिक रुग्ण असल्यास विभक्त होता येते.त्यासाठी विवाहापूर्वी मानसिक आजाराबाबत संपूर्ण माहिती सांगावयास पाहिजे.
नोकरी,व्यवसाया मध्ये अपयश – वैवाहिक जीवन जगताना अथवा विवाहापूर्वी जोडीदाराबाबत सुरक्षित नोकरी अथवा व्यवसाय असेल तरच विवाह जुळविला जातो.व काही जोडप्यांमध्ये विवाह टिकवण्यासाठी स्वतःच्या भविष्याचा विचार महत्वाचा असतो असे म्हणत नोकरी,पैसा प्रतिष्ठा या गोष्टींचा खूप महत्व दिल जात. त्यामुळे कधीतरी दोघांपैकी एकाची परिस्थिती बिकट होऊ शकते तेव्हा एकमेकांस साथ देण्याच्या एवजी त्याची साथ सोडून जाताना दिसतात. काही जोडपी हे भावनांना महत्व न देता सद्यस्थिती चा विचार करून निर्णय घेतात.
संशयी स्वभाव – विवाह झाल्यावर संसाराचा गाडा पुढे सुरळीत चालण्यासाठी आज पती-पत्नी दोघेपण कामासाठी घराबाहेर पडतात.प्रत्येक जण आपापल्या शिक्षणाच्या अनुभवाच्या जोरावर काम करत असतो.दोघांपैकी कधी कधी कामाच्या वेळा,कामाची पद्धत तसेच कामाच्या ठिकाणाचा परिसर तेथील लोक या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यामुळे हि परिस्थिती समजून न घेता चुकीच्या पद्धतीने विचार केला जातो.गैरसमज करून घेतला जातो.व नंतरच्या काही कालावधीत संशय निर्माण होण्यास सुरुवात होते.त्यामुळे घरात वादविवाद,भांडणे होण्यास सुरुवात होते.व त्यातूनच एकत्र न राहण्याचा विचार सुरु होतो व काही कालावधी नंतर सहनशक्ती चा पराकोट होऊन घटस्फोट घेतला जातो.
व्यसनाधीनता – कुटुंब कोणतेही असो म्हणजेच मध्यमवर्गीय वा उच्चवर्गीय ,गरीब असो व श्रीमंत घरामध्ये व्यसनाला प्रवेश मिळाला कि कुटुंबाची वाताहत सुरु होते.दारू,गांजा,जुगार,या लोकांना माहित असलेल्या व्यसनांच्या प्रकारामध्ये कितीतरी घरे उध्वस्त झालेली आपण पाहिलेली आहेत.नशा करून यायचं व पत्नीस मारहाण करायची, मुलांचा विचार न करता व्यसन करायचं आणि घरात मारहाण तोडफोड करायचं,संशय घ्यायचा व शिवीगाळ करायचं अश्या वर्तनामुळे घरातील पत्नी व मुले हे घाबरून राहू लागतात.व शेवटी विभक्त होण्याचा विचार केला जातो.
दाम्पत्यास मुल न होणे – विवाह हे का बंधन आहे.एक जबाबदारी आहे. आज हि समाजात विवाह म्हणजे घराण्याचे नाव पुढे घेऊन जाणे बाबत चा प्रथम विचार केला जातो.वंश वाढवणे ,मुल होणे या गोष्टीना प्राधान्य दिले जाते .जोडप्यास जर काही शारीरक कमतरतेमुळे मुल होऊ शकले नाही तर कुटुंबातील इतर सदस्य सतत बोलत असतात.टोमणे मारत असतात. व कुटुंबात कलह निर्माण करतात व त्यामुळे वादविवादला सुरुवात होते.या सगळ्या गोंधळात हा विचार कोणी करत नाही कि मुल होणे हे आता उपचाराने शक्य आहे .पण आपली कमतरता झाकून ठेवण्यासाठी घटस्फोट घेण्याचा विचार महत्वाचा वाटतो.
हुंडा,पैसा,मालमत्ता या गोष्टींची सतत मागणी – वैवाहिक आयुष्य सुरु करण्यापूर्वी दोन्ही कुटुंबाकडून देण्याघेण्याच्या गोष्टी केल्या जातात.आज मुली जरी आपल्या पायावर उभे राहून प्रगती करत असल्यातरी अजूनही विवाहाच्या वेळी देणेघेणे बाबत चर्चा हि केलीच जाते.घर प्रतिष्ठा पाहिले जाते.व त्यातूनच हुंडा ,मालमत्तेत हिस्सा ,पैसे ,सोने,घर , गाडी यासारख्या सुखकारक गोष्टींची मागणी हि केली जाते.आणि त्याची पूर्तता नाही केल्यास वादविवाद ,भांडण,मारहाण,मासिक ताण तणाव देणे त्यामुळे विभक्त होण्याचा विचार केला जातो.
सध्याच्या काळात घटस्फोटा चे प्रमाण वाढले आहे व त्याकडे समस्या म्हणून का पहिले जाते ?
विवाह हि परंपरागत चालत आलेली प्रथा आहे आणि सुसंस्कृत घरात तो एक शिष्टाचार म्हणून पाळला जातो.अलीकडच्या काळात घटस्फोटीत मुला-मुलींचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.घटस्फोट दोन पद्धतीने घेता येतो.एक म्हणजे परस्पर संमतीने व दुसरे म्हणजे कॉटस्टेड म्हणजेच दोघांपैकी एकाला घटस्फोट घ्यायचा नाही. मी या लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक धर्माचे कायदे हे वेगवेगळे आहेत.व त्या त्या धर्मानुसार विवाह व घटस्फोट केला जातो.पत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मा. जिल्हा न्यायालय असते हे आपण जाणतोच व या मा. जिल्हा न्यायालयात एक फमिली कोर्ट नावाचे एक विभाग असते तेथे घटस्फोटासाठी अर्ज करता येत.येथे तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करून वैवाहिक समुपदेशक समुपदेशन करतात व नंतर ठरविले जाते घटस्फोट मिळेल का नाही ते.
समाज हा व्यक्तींच्या समूहाने बनतो.त्यात कुटुंब हे एक महत्वाचे ठिकाण आहे जिथे माणूस जन्मतो,वाढतो व जगतो तसेच मृत पावतो. ह्या कुटुंबातच तो स्वतःला सुरक्षित समजतो.व याच कुटुंबामुळे त्याला नाव,धर्म,जात,नाती मिळतात.पण कालांतराने पाश्यात संस्कुतीचा शिरकाव झाला व एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला व विभक्त कुटुंब पद्धतीस जोर देण्यात आला . त्यामुळे आधुनिकीकरणाच्या मोहापायी आज कुटुंबातील सदस्य करियर,स्पर्धा ,प्रतिष्ठा या गोष्टीच्या मागे धावत आहे त्यामुळे घरात परस्पर संवाद कमी झालेला आहे.करियर शिक्षण यामुळे आज मुलांचे विवाह उशिरा होत आहेत.व नोकरी व्यवसायामुळे आज परिवारास वेळ न देणे,अहंकार कुरवाळत बसने,एकतर्फी निर्णय घेणे तसेच अलीकडे सोशल मिडीयाचा वापर अति प्रमाणात करणे, यामुळे जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होणे इत्यादी सारख्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत घटस्फोट होण्याच्या वाढीसाठी .
आपल्या भारतात दररोज सरासरी १९ घटस्फोटाचे अर्जाची नोंदणी केली जाते.असे मा.कौटुंबिक न्यायालयाकडून संकलित केलेल्या आकडेवारीनुसार समजते.
मी एक वैवाहिक समुपदेशक – माझ्या नजरेतून व अनुभवातून .
माझ मत व्यक्त करताना मी इतकच नमूद करेन कि, संसाराचा गाडा चालवताना समजूतदारपणा ची झालर जोडप्यांकडे असावी कि जेणेकरून हा गाडा व्यवस्थित चालेल.कोणत्याही नात्यामध्ये विश्वास महत्वाचा असतो.व तितकेच महत्वाचे हे कि दोघांपैकी एकाची घुसमट न होणे. व त्यासाठी काही वैवाहिक जीवन उत्तम व्यतीत करण्यासाठी मी तयार केलेली काही सूत्रे –
एकमेकांसोबत संवाद ठेवा
विश्वास ठेवा
आदर ठेवा
एकमेकांना वेळ दया
अहंकार बाजूला ठेवा
संशय घेऊ नका
एकमेकांच्या मतांचा व भावनांचा आदर करा …
पहा हि सूत्रे वापरून नक्कीच तुमचे वैवाहिक जीवन उत्तम व्यतीत होईल व घटस्फोट नावाचा प्रकार तुमच्या जीवनात डोकावणार नाही…
जाता जाता मला एक कविता आठवते …त्यात सुंदर शब्दात घटस्फोटाचे वर्णन केल आहे….
खूप छान मांडणी केली आहे, मोजकी सूत्रे जी पाळली पाहिजे ते तुम्ही सांगितले आहे.. की जे आजकालच्या व्यस्त दैनंदिनी जगताना (अकार्यक्षम दैनंदिनी) वास्तविकता विसरून कृत्रिम जिवन जगणारे विवाहबद्ध जोडप्यांना ही सूत्रे खूप महत्त्वाची आहेत
9 Comments
Nice
खूप छान
खूप छान मांडणी केली आहे, मोजकी सूत्रे जी पाळली पाहिजे ते तुम्ही सांगितले आहे.. की जे आजकालच्या व्यस्त दैनंदिनी जगताना (अकार्यक्षम दैनंदिनी) वास्तविकता विसरून कृत्रिम जिवन जगणारे विवाहबद्ध जोडप्यांना ही सूत्रे खूप महत्त्वाची आहेत
Good
आवडला ही फार मोठी समस्या आहे
Nice
This is fact and real article for new generation. Good message. Thanks
खूप छान मेसेज
Nice article.