व्यसन (Addiction) म्हणजे नशा देणाऱ्या पदार्थाचे किंवा मादक पदार्थाच्या सेवनाने मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन गुंगी येणे,शरीराचे अवयव शिथिल पडणे,ग्लानी येणे,विचार शक्तीचा ऱ्हास होणे इत्यादी प्रकार घडतात.मात्र मादक पदार्थाच्या सेवनाने मनावरील दडपण निघून जाते किंवा कमी होते म्हणून व्यसन करणे त्यामुळे या मादक द्रव्याची मग शरीराला सवय लागते.अश्या पदार्थाचे वारंवार सेवन करण्याची सवय म्हणजे व्यसन होय.
तसेच सध्याच्या काळात या अमली पदार्थ व मादक पदार्थांबरोबर सोशल मिडिया, मोबाईल– स्क्रीन चे ओब्सेशन,पोर्न चित्रपट पाहणे,कॉम्पुटरचे व्यसन,ऑनलाईन गेम,रमी,या प्रकारच्या नॉन केमिकल व्यसनाचे प्रमाण सध्या समाजात जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
व्यसन म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर,एखादी अशी सवय कि,ज्यामुळे मोठ्याप्रमाणावर शारीरिक ,मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही. व्यसन हे अमलीपदार्थ व मादक पदार्थ जसे कि दारू,गांजा,अफिम,ड्रग्ज वैगेरे तसेच तंबाखू, सिगरेट, हुक्का,व्हायटनर,पेट्रोल/रॉकेल चा वास हुंगणे इत्यादी प्रकारचे व्यसन लागणे होय.
भारतामध्ये सध्या व्यसनाधीनता हि सामाजिक व मानसिक समस्या बनलेली आहे.आजचा युवक हा देशाचा भविष्य आहे. आणि जगामधील सर्वात जास्त युवक वर्ग हा आपल्या भारत देशात व्यसनाने ग्रस्त आहेत.
व्यसनाधीनता हा प्राथमिक स्वरूपाचा आजार आहे .हा आजार शरीराच्या विविध अंगावर परिणाम करतो.व्यसनाधीनतेमुळे शरीर,मन,भावना,कुटुंब,समाज या सर्व गोष्टींवर महत्वाचा असा बदल होताना दिसून येतो.
दारू ,तंबाखू,सिगरेट-बिडी,हुक्का,उत्तेजक पदार्थामध्ये –कॉफीन व कोकेन,चरस- मारीवाना, गांजा- हशीश,स्क्रीन ओब्सेशन,मोबाईल गेम्स,सोशल मिडिया,जुगार,पोर्न क्लिप,व्हायटनर पेट्रोल,फिनेल.यांचा वास हुंगत राहणे….
व्यसन केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात व शरीरात महत्वाचे असे बदल होताना दिसून येतात. व ह्या बदलांना सामोरे जाताना व्यसन करणाऱ्या व्यक्तीबरोबर त्याचे कुटुंब,नातेवाईक व समाज यांनासुद्धा कळत नकळत पणे सामोरे जावे लागते .व्यसनामुळे शरीरात व मानसिकतेवर तर परिणाम होतोच पण सामाजिक व आर्थिक परिस्थिती वर देखील परिणाम होतो.
अ क्र | शारीरक बदल /लक्षणे | मानसिक बदल /लक्षणे |
१ | चेहरा व नाक लालबुंद होणे | उदास व चिंतात्तूर राहणे |
२ | हात पाय व चेहऱ्यावर सूज येणे | भास होणे,कानात आवाज येणे,भ्रम होणे |
३ | दृष्टी दोष होणे | चिडचिड करणे,शिवीगाळ |
४ | पुन्हा पुन्हा संसर्ग दोष होणे | असंबद्ध बडबड करणे |
५ | हातपाय थरथरणे,चक्कर येणे, | निद्रानाश |
६ | स्मरण शक्तीचा ऱ्हास होणे | तर्क निष्ठेचा अभाव . |
अ क्र | सामाजिक परिस्थितीत बदल | आर्थिक परिस्थितीत बदल |
१ | कामाच्या ठिकाणी उशिरा पोहोचणे अथवा दांड्या मारणे | कमावलेला पैसा व्यसनावर खर्च करणे |
२ | कौटुंबिक कलह व समस्या | घरातील संपती विकणे ,वस्तू चोरणे , |
३ | घटस्फोट होणे व नातेसंबध तुटणे | आर्थिकदृष्ट्या हलाकाची परिस्थिती त्यामुळे मुलांच्या शाळा शिक्षणात अडथळे |
४ | सतत व्यसनामुळे समाजात नाव खराब होणे व समस्या निर्माण होणे | सतत ची आर्थिक टंचाई |
५ | छोटे मोठे गुन्हे करणे . | —- |
व्यसनाधीनता हा मानसिक आजाराचाच एक अंग आहे.केवळ गमंत किंवा आग्रह म्हणून व्यसनाला सुरुवात होते.नंतर ती व्यक्ती त्या व्यसनावर पूर्ण संबधित पदार्थ अथवा वस्तू नाही मिळाला तर त्या व्यक्तीला मानसिक त्रास होतो.व हा त्रास दीर्घ स्वरूपाचा राहतो.
व्यसनाधीनतेमुळे मानसिक आजाराची लक्षणे दिसून येतात. अतिप्रमाणात अमलीपदार्थ व मादक पदार्थ सेवन करत राहिल्याने काही कालावधी नंतर रुग्ण उदास रहावयास लागतो.त्याची चिंता वाढते.तसेच त्याला कानात आवाज येऊ लागतात.त्याला भास होण्यास सुरुवात होते,पती पत्नी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना संशयित नजरेने पाहू लागतो.त्याला सतत वाटते कि सर्वजण मिळून माझ्याबाबत काहीतरी करणार आहेत .त्याला झोप कमी लागते व भूक कमी होते.अतिरिक्त व्यसनामुळे रुग्णाची विचार करण्याची क्षमता कमी होते.कोणतेही निर्णय घेताना आत्मविश्वासाचा अभाव आढळतो.
या अश्या लक्षणामुळे मानसिक आजारावर रुग्णास उपचार घेणे महत्वाचे ठरते.परंतु रुग्ण व्यसन करण्यास सोडत नाही त्यामुळे मानसिक आजार दिवसेंदिवस वाढत राहतो व शेवटी रुग्णास रुग्णालयात दाखल करावे लागते.
व्यसन करणाऱ्या व्यक्तीने व नातेवाईक यांनी जर उपचार घ्यावयाचे ठरवले तर रुग्णास मनोविकारतज्ज्ञ ,चिकिस्तालयीन मानसशास्त्रज्ञ,मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता,समुपदेशक, मनोविकार अधिपरिचारिका, व्यवसायोपचार तज्ञ यासारख्या तज्ञ मंडळी कडून रुग्णावर पुनर्वसनाकारीत काम केले जाते.रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याला त्वरित औषधोपचार सुरु केला जातो.व त्याची उपचार पद्धती ठरवली जाते ( Treatment Plan ) व त्यानुसार त्यांना समुपदेशन,विविध सायकोथेरपी ,ऑक्युपेशनल थेरपी, संगीत थेरपी,आर्ट थेरपी,व्यसन मुक्त झालेले रुग्ण यांच्या अनुभवकथन कार्यक्रमा द्वारे रुग्णास बरे करण्याचे प्रयत्न सुरु होतात. त्याचबरोबर त्यांना शारीरिक कामात व कष्टाच्या कामात त्यांना गुंतवून ठेवले जाते.ह्या सर्व प्रक्रियेमुळे रुग्णास सकारत्मकता येते.रुग्णास प्राणायम ,योगा,व्यायाम यामुळे एकाग्रता वाढते व शारीरक हालचाली करण्यास मदत मिळते.मानसिक आरोग्य मिळणे हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे. आणि रुग्ण कोणत्याही मानसिक आजाराने ग्रस्त असो त्याला लवकर उपचार मिळणे गरजेचे आहे. तसेच आपण सामान्य लोक म्हणून समाजातील अश्या रुग्णांकडे सहानभूतीने पाहत त्यांना लवकरात लवकर उपचार मिळवून देणे हे एक आपले कर्तव्य आहे असे मी समजते.
व्यसनाधीनता व्यक्तीस उपचार सुरु करण्याचे असल्यास त्यांनी पुढे नमूद केलेल्या शासकीय व निमशासकीय तसेच ऑफलाईन व ऑनलाईन उपचार या ठिकाणी घेऊ शकतात.
जाता जाता …
व्यसन म्हणजे जिवंत मरण
व्यसन सोडा फुलेल जीवन
You cannot copy content of this page
3 Comments
Very good article and most useful.
Congratulations 🎉
Nice information and useful
Very nice