नमस्कार मंडळी, दोनच दिवसापूर्वी नविन वर्ष सुरु झाले आणि सालाबादप्रमाणे आपण नविन वर्षाचे स्वागत नव नविन अश्या संकल्पाने करतो.त्यात प्रामुख्याने आरोग्याबबत जास्त संकल्प असे आपले असतात.व्यायाम ,शारीरिक आरोग्याची काळजी बरोबरच आपण सकस आणि पोषक आहार पण घ्यायला हवे ह्याबाबत ठरवतो.पण आपण एक विसरतो ते हे की ह्या बरोबर उत्तम मानसिक आरोग्य पण जपणे तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठीच हा लेख ….
नवीन वर्षाचे संकल्प अधिक चांगले मानसिक आरोग्य आणि निरोगीपणा कसे आणु शकतात? आपण २०२५ मध्ये प्रवेश करत असताना, आपल्याला अधिक चांगल्या मानसिक आरोग्याबाबतच्या गोष्टी विचारात घेऊ या. प्रथम आपण हे लक्षात घेऊ या की आपण जोपर्यंत स्वतःची काळजी घेत नाही आणि आपन स्वतःला महत्व देत नाही तोपर्यंत आपण मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यात यशस्वी होत नाही.
मानिसक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी त्यासाठी काय काराव लागेल? प्रथम आपण आपल्या कामाची सूची तयार करा .आता ह्या सूचीमध्ये नमूद असलेले कामे त्यातील महत्वाची कामे आणि काही कालावधी नंतर करण्याची कामे असे क्रम लावा. ह्यामुळे आपल्याला मानसिक ताण येणार नाही. हे एक सोप्प आणि महत्वाच उदहारण..
मद्यपान व व्यसन कमी करा: पार्टी मध्ये, मित्रांसोबत ,मद्यपान करणे आणि ह्यामध्ये सातत्य ठेवणे .ह्याचा परिणाम म्हणजे व्यसनापासून दूर राहू न शकणे. मद्यपान नियमित करण्याची सवय लागणे. ह्यामुळे मानसिक आरोग्य व नातेसंबध बिघडायला सुरुवात होते.त्यासाठी मद्यपान कमी करा अथवा करुच नका.
नियमित व्यायाम: व्यायाम मुळे मेंदू व शरीर उत्तम राहते.मेंदुमधिल जे रसायन असते ज्यामुळे मनुष्याचा मुड बदलत असतो .तो व्यायाम करण्याने मुड चांगला व् निरोगी राहतो.व्यायाम करण्याने शारीरिक आणि भावनिक आरोग्याला फायदा होतो.
पोषक आहार: नविन वर्षात पोषक आहार खाणे तसेच जीवनसत्वे नुसार अन्नाचे सेवन करणे महत्वाचे आहे. जंक फ़ूड, उघड्यावरचे अन्न, तळलेले पदार्थ याचे सेवन न करणे. शारीरिक बिघाड झाले तर नक्कीच मानसिक आरोग्य बिघडते.
भरपूर विश्रांती घेणे: आजच्या आधुनिक आणि व्यस्त जीवनात विशेषतः खाजगी कंपनी किंवा शिफ्ट मध्ये काम करणारे लोक याना कामामुळे पुरेशी विश्रांती ,झोप मिळत नाही. त्याचबरोबर रात्री जास्त वेळ मोबाईल वर रिल्स वैगेरे पाहत राहणे. त्यामुळे कालांतराने अति जागरण होणे सुरु होते व निद्रानाश होण्यास सुरुवात होती.नियमित विश्रांति मिळणे हे उत्तम मानसिक आरोग्य राहण्याचे मूलमंत्र आहे.त्यासाठी लवकर झोपणे व सकाळी लवकर उठ णे महत्वाचे आहे. संगणक, मोबाईल, लैपटॉप, यांचा वापर झोपायच्या आधी करू नका.त्याऐवजी मासिक, पुस्तके याचे वाचन करा अथवा मंद गोड आवाजातील गाणी एका.
स्वतःची कमी टिका करा: आपण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत. आपल्या स्वभावानुसार आपण वर्तन करत असतो. पण कधी कधी हे वर्तनामुळे नातेसंबधात बिघाड होतात व् आपण स्वतःला दोष द्यायला लागतो. टिका करायला लागतो. ह्यामुळे आपल्यात नकारात्मतक विचार यायला लागतात. आणि मानसिक आरोग्य बिघाड होण्यास कारणीभुत आपण स्वतः होतो. यासाठी आपला विश्वास ज्याच्यावर आहे त्याच्यासोबत मनमोकळं करा. संवाद साधा.
सोशल मिडियापासून दूर जा: आजकाल खुप मोठा ट्रेंड सुरु आहे की प्रत्येक भावनेचा व्हिडिओ रिल्स मध्ये बनवायचा आणि सोशल मिदियावर टाकायचा. ह्याचे परिणाम काय होतात ह्याचा विचार न करता आपण हीच कृति वारंवार करत राहतो. त्याचा परिणाम व्यक्ति ताण-तणावाला सामोरे जातो. मानसिक आरोग्य बिघडन्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. आपले मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी ह्या सोशल मिडिया पासून दूर राहणे योग्य आहे.
बदल स्वीकारा: बदल हा निसर्गाचा नियम आहे. वातावरण असो अथवा आपले आयुष्य ..बदल होणे हा नैसर्गिक नियम आहे. आणि तो मनापासून स्वीकारणे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत मिळते. कामाच्या ठिकाणी काही बदल झाल्यास आपली चिडचिड होते अथवा घरामध्ये एखादी आपली जवळची व्यक्ति सोडून निघून गेल्यास आपण हताश होतो. अश्यावेळेस चिंतित न होता बदल स्वीकारा. आणि ह्याबद्ल आपण कसे भविष्यात आपल्या वागण्यात बदल करू शकतो ह्याबाबत विचार करुन ठरवू शकतो. अश्याने आपल्याला ताण येणार नाही. आणि आपण आपले मानसिक आरोग्य चांगले ठेऊ शकतो.
जाता जाता शेवटी इतकच सांगेन की, आपल आरोग्य आपल्या हातात असते. कोणत्याही संकटाना सामोरे जाताना आपण खंबीरपणे त्याचा सामना करने महत्वाचे आहे. कोरोना सारखे महामारीचे संकट असो वा सामजिक, कौटुबिक, आर्थिक, वैगेरे समस्या असो आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी ह्या लेखाचा आपल्यासाठी उपयोग होईल अशी आशा करते.
सौ .रोहिणी भोसले –शेख समाज सेवा अधिक्षक प्रादेशिक मनोरुग्नालय,येरवडा, पुणे
Thanku madam evdhi chan mahiti dilya baddal tumhi je 7 point sangitale taytale kahi ch point me follow kart hote. But Aaj pasun nakki paraynt karen purna 7. Point follow karycha Thank you 🙏🏻
6 Comments
उत्तम लेख आहे मॅडम 🙏
Congratulations 🎉
Thanku madam evdhi chan mahiti dilya baddal tumhi je 7 point sangitale taytale kahi ch point me follow kart hote. But Aaj pasun nakki paraynt karen purna 7. Point follow karycha Thank you 🙏🏻
It’s the nice speech ma’am
Very nice & good writing madam
छान माहिती आणि सर्वांसाठी गरजेची