तसे पाहता ह्या विषयावर खुप लिहल गेल आहे .पण मी एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असल्याने महिन्यातून दोन ते पाच रुग्ण ह्या समस्येने ग्रस्त असलेले पाहत असते. त्यासाठी माझा हा एक प्रयत्न ….माहिती देण्याचा …
प्रथम आपण हे समजावून घेवु या की गेमिंग डिसऑर्डर म्हणजे काय ?
आपण आजुबाजुला पाहत असतो की लोकाना विविध प्रकारचे गेम खेळण्याचे व्यसन असते. हा खेळ डिजिटल गेम / मोबाईल गेम अथवा व्हिडिओ गेम ही असू शकतो. तर अश्या गेम ला आपल्या दैनदिन कार्यात अथवा वैयक्तिक जीवनात परस्पर संबधापेक्षा तसेच कामापेक्षा ती व्यक्ति खेळ खेळण्याला जास्त महत्त्व देतात, त्यामुळे दैनंदिन कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अश्या वेळेस ती व्यक्ति गेमिंग डिसऑर्डर ची रुग्ण झाली आहे हे समजते. ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक पैलूंवर नकारात्मक सुद्धा परिणाम होतात, ज्यात स्वत: ची काळजी, नातेसंबंध, शाळा आणि काम यांचा समावेश होतो.
डब्ल्यूएचओ’नं नुकतीच, विविध आजारांविषयीची माहितीचं संकलन असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील यादी जाहीर केली आहे. त्या यादीत आजारांचे दोन प्रकार आहेत. ‘घातक गेमिंग’ (hazardous gaming) आणि ‘गेमिंग डिसऑर्डर’ (gaming disorder) असं त्याला म्हटलं गेलंय. इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर (IGD) हे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स पाचव्या आवृत्तीच्या (DSM-5) विभाग III मध्ये समाविष्ट केले आहे, आणि त्याच्या अति गेमिंगमुळे वेळेची जाणीव कमी होते, राग आणि चिंता यांसारख्या नकारात्मक भावनांचा उद्रेक होतो.
गेमिंग डिसऑर्डर ची लक्षणे कोणती ?
- जास्त गेम खेळल्यामुळे शाळा, काम किंवा घरातील जबाबदाऱ्यांमध्ये खराब कामगिरी.
- पैसे काढण्याची लक्षणे, जसे की दुःख, चिंता किंवा चिडचिड, जेव्हा गेम काढून टाकले जातात किंवा गेमिंग शक्य नसते.
- गेमिंग मुळे इतर पूर्वी आनंदित जीवनमान आणि सामजिक संबध सोडून जाणे.
- गेम खेळण्यात किती वेळ घालवला याबद्दल कुटुंबातील सदस्यांना किंवा इतरांशी खोटे बोलणे.
- लोकांमध्ये मिसळणं कमी होतं.
- मोबाइलवरच सतत व्यग्र असणं. सुरुवातीला एक ते दोन तासांचा असलेला वापर नंतर १० ते १२ तासांवर जातो.
- झोप कमी होते.
- कुटुंब आणि मित्रपरिवाराकडे दुर्लक्ष.
- तासनतास गेम खेळणं, गेम न खेळता आल्यास अस्वस्थता, बेचैनी, चिडचिड, उदासीनता, निराशा वाटणे.
- सतत गेम्सचा विचार करत राहणं. एकटेपणा जाणवण.
- झोप, खाणं-पिण्याच्या वेळा बदलणं, शारीरिक मानसिक थकवा वाटणं,
- अभ्यास, छंद, मित्रपरिवार अशा इतर कुठल्याही गोष्टींत मन न रमणं
- जबाबदाऱ्यांकडेही दुर्लक्ष करणं
गेमिंग व्यसन लागने ह्याची कारणे काय आहेत ?
ऑनलाइन गेमच्या व्यसनाच्या कारणांमध्ये मानसिक आरोग्य समस्या , डोपामाईन मध्ये बिघाड झाल्यास,समस्या व् परिस्थितिशी सामना न करण्यासाठी,कौटुमबिक वाद, समवयस्क मित्र,भावंड यांच्याकडून होणारा दबाव इत्यादि कारणाचा समावेश होतो.
गेमिंग व्यसना मुळे रोजच्या जीवनमानावर होणारा परिणाम
- जीवनशैली – गेमिंग च्या व्यसनाचा व्यक्तीच्या अथवा मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम करत नाहित तर तुमच्या जीवनशैलीच्या प्रत्येक घटकावर परिणाम करतात.जेवण असो वा झोप स्वछता असो वा काम तुमच्या प्रत्येक जीवनशैली वर नकारात्मक परिणाम करतो.
- आत्मविश्वास – ह्या व्यसनाचा आत्मविश्वासावर नक्कीच परिणाम पडतो. अभ्यासामध्ये लक्ष न लागने ,एकाग्रता मध्ये अड़चण, कामात चुका होणे ,संवाद साधताना अडचण होणे.
- आरोग्य – ह्या व्यसनाचा मानसिक आणि शारीरिक आरोग्य यामध्ये बिघाड होतो. शारीरिक बिघाडामध्ये जीवनसत्व याची कमतरता,अपचन,तर मानसिक बिघाडा मध्ये नैराश्य ,चिंता, राग अनावर होणे ,त्यासाठी हिंसा चा आधार घेणे झोप कमी इत्यादि परिणाम होताना दिसून येतो.
गेमिंग व्यसनासाठीच्या उपाययोजना
- आधीच काळजी घेणे उत्तम म्हणजे मुलाना ह्या गेम ,मोबाईल,इटरनेट वापर बाबत माहिती करुन देने.
- मुलांशी व त्या व्यक्तिशी संवाद साधने.
- मोबाइल-इटरनेट वापर करण्याबाबत वेळ ठरवून देणे आणि त्याचे पालन करने .
- मुलाना मैदानी खेळ खेळने, मित्रांमध्ये मिसळने बाबत प्रोस्ताहित करने..
- मनोचिकित्सक किंवा बाल मानसशास्त्रज्ञांचा व क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांचा सल्ला घेणे.
- या व्यक्तींचे अथवा मुलांचे मुल्यांकंन आणि निदान झाल्यानंतर उपचार आखणी करणे त्यामध्ये औषधे घेणे बरोबरच सायकोथेरपी व समुपदेशन याचे नियोजन.
- पालक –शिक्षक आणि समाज यांचे प्रबोधन होणे आवश्यक.
- व्यसनमुक्ति व पुनर्वसन केंद्र येथे उपचार व मार्गदर्शन घेणे अथवा दाखल करने.
सौ .रोहिणी भोसले –शेख
चिकिस्तालयीन मानसशास्त्रज्ञ
सोशल मेंटल हेल्थ इशु क्लिनिक , पुणे
5 Comments
एक दम छान विचार मांडला आहे, खरच मुलं वाया जात आहेत या गेम मुळे
Yes you are right.we have to decide how much time wil be waste with mobile.
Mobile is the good and bad also.
Childrens must be play physically.dont give mobile.
A great useful article.
Congratulations 🎉
लेख फार सुंदर आणि सुटसुटीत आहे. सहज समजेल असा आणि फार कामाचा आहे छान 👌👌
Wonderful and very informative. Keep up the good work 👏