दरवर्षी इंटर नॅशनल असोसिएशन सुसाइड प्रिव्हेशन द्वारे दि- १० सप्टेबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधुन जगभरात लोकाना आत्महत्या आणि या दिवसाचे महत्व जनजागृतीतून
निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश असतो. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस २०२३ या वर्षाचे घोषवाक्य “ कृतीतून आशा निर्माण करणे “ ( Creating Hope Through Action) असे घोषवाक्य प्रसिद्ध केले आहे.या घोषवाक्यानुसार “समाजात मानसिक,सामाजिक,आर्थिक,व्यावहारिक इत्यादि समस्येने हताश झालेल्या व्यक्तिना ज्याना आत्मदहनाचे विचार येत असतात अश्या व्यक्तिना आपल्या कृतीतून विचारातून सकारात्मकतेने विचार करावयास लावणे व त्याचबरोबर त्याना आत्महत्येच्या विचारातून परावृत्त करणे”.
सर्वजण जाणतच आहात आज जगभरातील कोव्हिड-१९ या आजारासारख्या महामारीशी सामना अजूनही करत आहोत ,या महामारीमुळे सामान्य लोकांबरोबर चाकरमान्याचेही जीवन कोलमडून पडले आहे.बेरोजगारी ,व्यसनाधीनता ,ताण तणाव, नैराश्य, घटस्फोट ,नातेसंबधात दुरावा व समस्या इत्यादि समस्यांना सामोरे जाता जाता आर्थिक नुकसान, व्यापारावर निर्बंध या सारख्या प्रश्नांना जगभरातील लोक सामोरे जात आहेत. रोजचे आपले दैनदिन आयुष्य जगताना रोज नविन नविन असे कठिन प्रश्न सामोरे येत आहेत. या अश्या विविध समस्यांमुळे व्यक्ति आत्महत्या चा मार्ग हताश होउन स्वीकारतो.
”आत्महत्या करण्यासाठी काही घटक कारणीभुत आहेत.त्याचाही प्रामुख्याने विचार करावयास हवे असे वाटते”.
सामाजिक घटक – अन्न वस्त्र निवारा व त्याचबरोबर प्रतिष्ठा या गोष्टींना आजकाल खुपसे महत्व आलेले आहे.आपल्या दैनदिन गरजांना पूर्ण करताना आपण आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी स्पर्धेत उतरतो.व यश मिळविता आपण या गोष्टींकड़े सकरात्मकतेने न पाहता प्रतिष्ठेच्या व अहंकारेच्या उद्देशाने पाहत जातो.आणि त्यातूनच यश-अपयशाचा प्रवास सुरु होतो.ताण-तणाव ,स्पर्धा ,नैराश्य,चिंता या गोष्टीनमुळे व्यक्ति आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो.
मानसशास्त्रीय घटक – व्यक्ति जेव्हा मूड डिसऑर्डर / डिप्रेशन या मानसिक रोग निदानाशी निगडित असतो तेव्हा तो सतत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतो.नैराश्य आणि आत्महत्या यांचा खुप जवळचा संबध आहे.या कृतीला आवर घालण्यासाठी योग्य औषधोपचार व समुपदेशनाद्वारेच व्यक्तिस यातून बाहेर पाडता येते.
सांस्कृतिक घटक – आजकाल रंगभूमि ,चित्रपट,OTT स्क्रीन ,इत्यादि क्षेत्रात टिकण्यासाठी स्पर्धा होताना दिसून येत आहे.त्याचबरोबर रियालटी शो ,डान्स स्पर्धा,अश्या लवकरच प्रसिद्धी मिळणारे कार्यक्रम प्रसारित होताना दिसत आहेत.व यातूनच स्पर्धा वाढते व त्यामुळे मन व डोक यामध्ये सातत्य न टिकवता आले की ताण वाढतो व हार होईल या भीतीने आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे .
आर्थिक घटक – दैनदिन जीवन जगण्यासाठी पैसा महत्वाचा असतो.पण कधी हाच पैसा आपल्याकडे आत्महत्या करण्यासाठी कारणीभुत होऊ शकतो हे समजतच नाही.पैसा मिळवण्यासाठी सतत काम करत राहणे, टार्गेट पूर्ण करण्यासाठी धावपळ करणे .कार्यालयीन राजकारण यांना सामोरे जाणे .या अश्या समस्यांबरोबर जीवन जगताना चिंता,नैराश्य,तणाव,भीति असुरक्षितता यामुळे व्यक्ती व्यसन करण्यास सुरुवात करतो.व या प्रश्नांना सामोरे जाताना आत्महत्या करण्याचा विचार करतो.
आत्महत्येचा विचार करणारे रुग्ण यांच्यात दिसून येणारी लक्षणे
चिंताग्रस्त होणे
नैराश्य
ताण-तणाव
अधिक चिडचिड होणे
झोप व जेवण कमी होणे
अधिक विरोधाभासी होणे
एकटे राहणे
आपल्या मुड मध्ये सतत बदल करने
व्यसन करणे
नकारात्मक विचार करणे
आत्महत्या या विचारातून धूम ठोक ण्यासाठी पुढील गोष्टींचा जरुर विचार करावा.…
आपली समस्या व निर्माण झालेली परिस्थिति जशी आहे तशी न घाबरता स्वीकार करणे.
योग्य मार्गदर्शन,औषधोपचार ,समुपदेशन ,सायकोथेरपी या गोष्टींची मदत घेऊन परिस्थितीवर मात करता येते.
आपले भविष्य चांगले घडवायचे आहे हे तर नक्कीच पण त्याचबरोबर आजच्या दिवसभरातील विचार व कृतिंना तितकेच महत्व दया.
आपले छंद जोपसा.
प्राणायाम,योगासने,नियमित व्यायाम इत्यादि घटकांचा समावेश आपल्या दैनदिनीमध्ये ठेवा.
कुटुंबात ,कामाच्या ठिकाणी,मित्रपरिवार ,समाजात अश्या व्यक्ति दिसून आल्यास त्याना एकटे ठेऊ किंवा एकटे राहू देऊ नका .
व्यक्तीच्या मानसिक अवस्थेत जर बदल जाणवत असेल तर नजीकच्या मानसोपचार रुग्णालयात उपचार त्वरित सुरु करावे अथवा भेट देऊन माहिती घ्यावी,
आत्महत्या करण्याचा विचार जर येत असतील तर शासकीय स्तरावर आयोजित ऑनलाइन फ्री फोन “ टेली मानस” नावाने सुरु केलेल्या विभागाच्या टोल फ्री नंबर- १४४१६ या नंबर वर फोन करुन समुपदेशन करून घेऊ शकता.
हा विषय खुप मोठा व विस्तृत आहे. मी थोडक्यात माडण्याचा प्रयत्न केला .जाता जाता मला आठवते ते प्रसिद्ध कवियत्री एमिली डीकन्संस यांची कविता ..त्याच्या चार ओळी..
2 Comments
👌👌👌👌 very nice 👍👍
Nice