पती पत्नी मुलाला जन्म देतात व ते पालक,आई-वडील म्हणून नावारूपाला येतात.मुले व पालक यांचे नाते खूप सुंदर व नाजूक असते.असे म्हणतात कि मुलांची पहिली शिक्षिका हि आईच असते.म्हणून तर आजच्या आधुनिक काळात हि मुल आईच्या पोटात असतानाच आईला गर्भसंस्काराचे धडे गिरवण्यास देतात. असे म्हटले जाते कि आई जे बोलते,वाचते,विचार करते त्याला मुल पोटातून हुंकार देत.त्यामुळे घरातील मोठी वडीलधारी माणसे, उपचार करणारे डॉक्टर हे आईला किंवा गरोदर स्त्रीला सांगतात कि चांगले वाचन कर ,सदेव सकारात्मक विचार ठेव,चांगले बोल,उत्तम आरोग्य ठेव तसेच मनशांती साठी योग प्राणायम कर यामुळे गर्भात वाढणाऱ्या बाळाला बाल संस्काराचे धडे मिळतील.
मुले व आईवडील यांच्यातील सकारात्मक संबध मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी खूप आवश्यक असते.खर म्हणजे मन हे निरोगी असते.पण आधी शरीर निरोगी असायला हवे .तरच मन ताजेतवाने प्रसन्न राहते.पालकांनी हे लक्षात ठेवायला हवे कि मुलांचा सर्वांगीण विकासासाठी मानसिक व शारीरिक सुदृढता हवी.आणि ह्यासाठी पालक व मुले यांच्यातील परस्पर संबध उत्तम हवे.
मुले व पालक यांनी परस्पर संबध कसे जोपासायचे?
आई हि सुसंस्काराची जननी आहे.आई वडिलांच्या प्रत्येक कृतीत प्रत्येक शब्दात तसेच सल्ला व उपदेशात सुसंस्कार व नैतिक मुल्य भरलेली असतात.आई वडील ,शाळा,शिक्षक हे संस्काराचे अधिष्ठान आहे.समाज जर समृद्ध व सकस हवा असेल तर ते बाळकडू मुलांच्या लहानपणीच मुलांना पाजावे लागेल.
डॉ.जझमिन मेकॉय असे म्हणतात कि , मुले पालक आणि मुलांच्या नात्यात एक सीमारेषा टिकवणे महत्वाचे असते.
काही महत्वाची मुद्दे पालक व मुले यांच्यातील परस्पर संबध वाढीसाठी:-
- संवाद साधणे – पालक व मुलांमध्ये अतिशय स्पष्ट संवाद साधने आवश्यक आहे. मुलांच्या गोष्टी अथवा त्यांचे म्हणणे हे पालकांनी ऐकावयास हवे.तसेच कोणकोणत्या गोष्टी ना महत्व द्यायचे अथवा नाही हे मुलांना काही गोष्टी व बोधकथा यांचे उदाहरण देऊन समजावून सांगावे.त्यांच्या गोष्टीना झिडकारून लाऊ नये.आता मला वेळ नाही आपण नंतर बोलू असे सारखे बोलून त्यांना टाळू नये. तर काम अथवा त्यावेळची परिस्थिती त्यांना समजून सांगून नंतर बोलतो असे सांगावे.व आपले काम झाल्यानंतर त्वरित मुलांसोबत संवाद साधावा.
- मुलांसोबत सहानभूती ठेवणे – मुलांच्या भावना ह्या कधीकधी पालकांना गोंधळात टाकणाऱ्या असतात.मुले जे पाहतात,ऐकतात तेच बोलतात कधी योग्य गोष्टी अथवा कधी चुकीच्या गोष्टी पालकांसमोर मांडतात.पालक व मुले यांच्यात मुलांच्या प्रती सहानभूती असणे आवश्यक आहे.त्यामुळे सहानभूतीचा गुण मुलांमध्ये रुजविण्यासाठी पालकांनी स्वतः मुलांबद्दल सहानभूती बाळगावी.त्यामुळे मुले हि सर्वांशी कृतज्ञतेच्या भावना ठेवून वागू लागतात.
- मुलांच्या मतांचा आदर ठेवावा- मुल हे प्रथम आपल्या आईवडिलांकडेच आपले म्हणणे मांडत असतो.त्याचे मत हे देखील पालकांनी महत्वाचे समजायला हवे.कारण त्याच्या मतप्रदर्शना मुळे पालक व शिक्षक यांना मुलांचे आचार व विचार योग्य वा अयोग्य आहेत हे समजेल. यामुळे पालक व मुले यांच्यातील संबध चांगले राहण्यात मदत मिळेल .
- मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवा – मुले हे पालकांचे अनुकरण करतात.पालक जसे वागतात,बोलतात ते आत्मसाद करतात व तसे वागतात.पालकांपैकी एकजण जर आपल्या जोडीदारावर ओरडणे ,मारहाण,भांडण,वादविवाद यासारख्या गोष्टींमुळे मुले हेच पाहतात व आपल्या पालकांना किंमत न देणे,त्यांचे काही न ऐकणे ,त्यांच्यावर चिडचिड करणे अश्या गोष्टी मुलांमध्ये दिसून येतात.त्यामुळे पालकांनी आपले मतभेद,भांडण वैगेरे मुलांपुढे व्यक्त करू नये.कौटुंबिक वातावरण उत्तम राहील याकडे लक्ष द्यावे.तसेच आपले मुल घराबाहेर किती वेळ राहतो तो कोणासोबत राहतो तसेच त्याचे कोणकोण मित्र मंडळी आहेत याकडे लक्ष द्यावे.
- मुलांना ताण तणावाला सामोरे जाण्यास मदत करा – आपल मुल हे कोणत्याही वयोमानात असो तो कधी न कधी ताण तणावाला सामोरे जात असतो.शाळा,पालक,मित्रपरिवार,सपर्धा,परीक्षा,करियर यांमध्ये वावरताना तो सतत ताण तणावाला सामोरे जात असतो.ताण घेण हे आपल्या प्रगतीसाठी जितक चांगल आहे. तितकच अपयशाच्या ताण तणावाला सामोरे जाणे हि महत्वाचे असते.पालकांनी सतत मुलांच्या ताण तणावाचे व्यवस्थापन करून त्यांना या समस्येला सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करावे. सहनशिलते चा पाठ शिकवावा.संवाद साधावा.
- मुलांवर अपेक्षांचे ओझे लादु नये- आजकाल पालक हे नोकरीनिमित्त जास्त वेळ घराबाहेर असतात.त्यामुळे मुल हे घरी सांभाळणाऱ्या मावशी-काकान सोबत अथवा पाळणाघरे येथे जास्त वेळ असतात.त्यामुळे आपली मुले हि स्मार्ट व्हावी व या बाहेरच्या जगात मोकळेपणाने वावरताना त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विविध स्पर्धेत उतरवल जात.तसेच विभक्त कुटुंबांमुळे सर्वांची अशी वेगवेगळी रूम असतात त्यामुळे मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना आपल्यापासून वेगळ ठेवलं जात.मुलांनी परीक्षेत जास्त मार्क मिळवावे तसेच सर्व गुणांमध्ये तो निपुण असावा असे पालकांना सतत वाटत असते.त्यामुळे त्याच्या खेळण्याच्या वयात तो विविध स्पर्धा देत असतो.व लहान वयातच त्याचे लहानपण निघून जाते.व आई वडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली तो दडपून जातो.कधीकधी तर या अपेक्षा पूर्तता न करता आल्यामुळे मुलांचे आत्महत्या करण्याकडे आजकाल कल वाढलेला दिसून येत आहे.
- मुलांना चांगल्या वाईट गोष्टींची शिकवण दया – पालकांनी मुलांच्या शारीरिक मानसिक वाढी दरम्यान मुलांमध्ये होणारे बदल ह्याची पूर्वकल्पना मुलांना पालकांनी वेळेतच न लाजता करून द्यावी.लाहान मुलांना bad touch आणि good touch याबाबत माहिती करून द्यावी.त्यांच्या शरीर रचनेची व महत्वाच्या शरीराच्या भागाची माहिती करून देणे महत्वाचे आहे.लोकांसोबत बोलताना वागताना कशी काळजी घ्यायची याबाबत माहिती दया.
मुले व मानसिक आजार:-
लहान मुलं मस्तीखोर असतातच ते स्वाभाविक आहे.मात्र एखादी गोष्ट मनाप्रमाणे न झाल्यास ती जास्त आक्रमक होतात म्हणजे त्यांना एखादा मानसिक आजार होऊ शकतो .मुलांच्या मानसिक आजाराची कारणे हि वेगवेगळी असू शकतात.काही आजार हे जन्मताच असतात व काही आजार हे कुटुंब ,मित्रपरिवार,परिस्थिती काही वाईट घटना यामुळे होऊ शकतात.
मुलांचे मानसिक आजार कोणते ?
- अटेन्शन डीफिशीयन्सी हायपर अक्टीविटी डीसओर्डर –ADHD
- चिंता समस्या
- वर्तन समस्या
- नैराश्य
- मतिमंदता
- व्यसनाधीनता
- झोपेच्या समस्या
- अंथरून ओले करणे
- ऑटीझम
- लर्निंग डीसअबिलीटी / learning Disability
इत्यादी सारखे महत्वाचे हे मानसिक आजार मुलांमध्ये आढळून येत आहेत.संशोधनात असे आढळून आले आहे कि एकूण ७ मुलांपैकी १ मुल हे मानसिक आजाराने पिडीत आहे.
पालक आणि मुले यांच्यात परस्पर संबध बिघडले तर काय परिणाम होतात?
पालक व मुले यांच्यातील संबध हे खूप नाजूकपणे जोपासली पाहिजे.त्याला कधी सहानभूती तर कधी कठोरपणे समजावून सांगण्याची झालर लावूनच मुलांचे पालन पोषण करावे.अति लाड व अति शिस्त न ठेवता योग्य मार्गदर्शन करतच मुलांना वाढवावे. आपासात जर संबध बिघडले तर मुलांमध्ये पुढीलप्रमाणे परिणाम दिसून येतात
- मुल हे चिडखोर व हट्टी बनते
- मुले हि खोटी बोलायला शिकतात.
- मुल हि व्यसनाच्या आहारी जातात
- मुल चुकीच्या गोष्टी आत्मसाद करतात- चोरी,बलात्कार,खून सारख्या घटनांमुळे मुले बालगुन्हेगार बनतात .
समुपदेशकाची पालक व मुले यांच्या नातेसंबधा बाबत ची महत्वाची भूमिका:-
जेव्हा पालक एखाद्या विशिष्ट मानसिक भावनिक किंवा वर्तणुकीशी संबधित परिस्थितीचा सामना करू शकत नाहीत.तेव्हा बाल समुपदेशक कार्य करतात.समुपदेशन हि एक शास्त्र शुद्ध प्रक्रिया आहे.प्रत्येक समस्याग्रस्त मुल व पालक त्यांना योग्य तो मार्ग दाखवण्याचे काम समुपदेशक करत असतो.समुपदेशक हा प्रथम पालक व मुले यांच्यात उद्भवलेल्या समस्येचा अभ्यास करतो व त्याला सामोरे कसे जायचे तसे त्यांना समुपदेशन करतो .आजकाल बहुतांश पालक हे आपल्या समस्या घेऊन समुपदेशकाकडे जात असलेले दिसत आहे.तसेच शाळा, महाविद्यालय येथे पण समुपदेशकाची नियुक्ती केली जात आहे.मुलांना व पालकांना जीवनातील उत्कृष्टपणाकडे नेण्यासाठी त्यांच्यातील भावनिक मूल्यांशी संपर्क ठेवत त्यांच्यात सुसंवाद आणण्यासाठी समुपदेशक महत्वाची भूमिका पार पाडत असतो.
जाता जाता … पालक व मुले यांच्यासाठी
जिंकायचं नव्हतच मला…
कारण तू हरलेल चालणार नाही..
खरच सांगू का ..
आपल्यात शब्दांची नाही तर भावनांची ओढ आहे..
त्यात सपर्धा कधीच ठरणार नाही…
सौ रोहिणी भोसले-शेख ….
7 Comments
Must read article by every parent👍👌👌
Khup sundar mahiti aahai khar tar attachya paristitil mhatvacha nahi najuk vishay aahai yachi palakana garaj aahai khup chhan……………
खूप सुंदर आहे , आज काल च्या पेरेंट्स साठी खूप मस्त माहिती दिलीत मॅडम, आम्हाला खूप उयुक्त आहे..👌👌👌👌
It is very useful information being as a parent and even this is the reality of the family but good content for the parents to understand to their children very well.
पालक आणि मुले यांच्या नातेसंबंध बाबत खूपच सुंदर लेख👌👌
अभिनंदन आणि शुभेच्छा🌹🌹
खूप सुंदर लेख. पालकांसाठी महत्त्वपूर्ण.
Thank you for your valuable comments 🙏😊