स्किझोफ्रेनिया हा आजार मानसिक आजारातील महत्वाचा आणि भयानक असा आजार आहे.ई .सन १९०८ या काळात युजेन ब्लूललर या मानासशास्त्रज्ञाने या आजाराला स्किझोफ्रेनिया हे नाव दिले. स्किझोफ्रेनिया हा शब्द ग्रीक भाषेतील दोन शब्दातून तयार झाला आहे. स्किझिन म्हणजे बदलणारी. वफ्रेन म्हणजे मन. मराठीत याला दुभंगलेले मन किवा छीन्नमनस्कता असे म्हटले जाते.
संशोधनाच्या आकडेवारीनुसार साधारण १०० लोकांमध्ये १ याप्रमाणे स्किझोफ्रेनिया बाधित व्यक्ती आढळते.
स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या एकूण जगातील लोकसंख्याच्या मानाने हि संख्या सर्वात जास्त आहे.व भारतामध्ये ४० ते ५० लाख लोक हे स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त आहेत.
हा आजार आपल्यालाच झाला आहे हे कसे ओळखायचे
हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होवू शकतो.साधारण वय १६ ते ४५ या वयोगटातील व्यक्ती ना हा आजार होवू शकतो. माणसाच्या डोक्यात सतत विचार असतात.त्यानुसार तो आपल्या मनात भावना निर्माण करत असतो,विचार व भावना यांच्याशी जुळवून घेत त्याप्रमाणे तो वर्तन करत असतो.विचार भावना व वर्तन यांच्यामध्ये योग्यपद्धतीने ताळमेळ घालता आल म्हणजे ती व्यक्ती सामान्यपणे वर्तन करते.पण या तिनहि गोष्टींशी ताळमेळ घालता आल नाही कि वर्तनात / वागण्यात बदल दिसून येतो.म्हणजे काय तर चार चौघा सारखे न वागणे, परिस्थितीनुसार वर्तन न करणे ,हसणे,पुटपुटणे इत्यादी बदल दिसून येतो .
स्किझोफ्रेनिया आजाराची लक्षणे कोणती
स्किझोफ्रेनिया या आजाराची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे :-
१) भास होणे
२) भ्रम होणे
३) विचारात सतत बदल / एकाग्रता नसणे
४) समाजात मिसळायला ण आवडणे / एकट राहणे
५) विविध आकाराची चित्रे दिसणे
६) वस्तूंची तोडफोड , शिवीगाळ करणे , असबंध बडबड करणे , पुटपुटत बोलणे
७) सतत कोण्यातरी अलग विश्वात रममाण होणे, कोनास तरी सतत नावे ठेवणे .
८) अस्वछच राहणीमान , आंघोळ न करता तसेच राहणे
इत्यादी महत्वाची लक्षणे दिलेली आहेत.
स्किझोफ्रेनिया हा आजार का होतो
शास्त्रीय भाषेत सांगायचे म्हटले तर प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूमध्ये न्यूरोट्रांसमीटरआढळते यालाच डोपामाईन असे म्हटले जाते. डोपामाईन नामक द्रव्याची रासानिक क्रिया हि मेंदूमध्ये महत्वाची असते. या आजारी ग्रस्त व्यक्तीच्या मेंदू मधील डोपामाईन ची क्रिया बिघडली कि त्या व्यक्तीस स्किझोफ्रेनिया होवू शकतो.
अद्यापही मनोविकारतज्ज्ञ या आजाराचे निदान करताना खूप वेळा विविध प्रक्रियेचे संशोधन करतात. त्वरित या रोगाचे निदान करत नाहीत. काही मनोविकारतज्ज्ञ मानसशास्त्रीय किवा इतर शारीरिक टेस्ट च्या मदतीने ह्या आजाराबाबत निदान करतात.
वैदकीय क्षेत्रामध्ये अद्यापही आजाराबाबत संशोधन चालू आहे.
अनुवंशिक हे हि कारण आहे या आजाराबाबत .ज्या बाधित व्यक्तीच्या आई-वडिलास जर हा आजार झालेला असेल तर त्यांच्या अपत्यास १० ते १५ टक्के हा आजार होवू शकतो असे संशोधनाने दिसून आलेले आहे.
कौटुबिक कलह,जमीन जुमला , वैवाहिक समस्या, घटस्फोट, आर्थिक,सामाजिक, राजकीय, प्रेमभंग इत्यादी गोष्टीमुळे येणाऱ्या तानतणावामुळे हि स्किझोफ्रेनिया हा आजार होवू शकतो.
ड्रग्ज किवा मादक पदार्थ च्या सेवनामुळेहि त्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया हा आजार होवू शकतो. गांजा, दारू ,एल एस डी इत्यादी अति सेवनाने अश्या व्यक्तींना या आजाराला सामोरे जावे लागते.
स्किझोफ्रेनिया रुग्णांवरील उपचार पद्धती
स्किझोफ्रेनिया आजाराशी सामना करत असलेल्या रुग्णास उपचारपद्धती पुढीलप्रमाणे वापरली जाते:-
१) मनोविकारतज्ज्ञ यांच्याकडून सखोल तपासणी व त्यांतर योग्य ते औषधोपचार केले जाते… रुग्णास यांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल केले जाते.
२) मानसोपचार थेरपी – वर्तन उपचार थेरपी / कौटूबिक उपचार थेरपी
३) विद्यत झटका / ECT
४) समुपदेशन
५) कौशल्य प्रशिक्षण रुग्णास देणे
६) व्यसनांपासून दूर राहणे
स्किझोफ्रेनिया आजारी व्यक्तीसाठी समाजाने व कुटूबाने घ्यावायची काळजी
एखाद्या घरात किवा समाजात जेव्हा स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त रुग्ण आढळून आल्यास त्याला त्वरित मनोविकारतज्ज्ञ यांच्याकडे घेवून जाणे. किवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे. अश्या रुग्णांना समजावून घेणे महत्वाचे आहे त्यांची प्रतारणा न करता त्यांना व त्यांच्या कुटूबाला योग्य ते मार्गदशन करावे. मानसिक आधार द्यावा.कि जेणेकरून अश्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल .
जाता जाता इतकेच मांडावेसे वाटते कि, या जगातील सर्व स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त असलेल्या सर्वतुम्हाला समर्पित करते…
“संकटाशी ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर ,
नजर रोखून नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर “…..
सौ रोहिणी भोसले -शेख
You cannot copy content of this page
1 Comment
Good article