आपण सर्वजण जन्माला आल्यापासून ते मृतुपर्यंत सगलेच वेगवेगळ्या अनुभवातून जातो.जय मानसिक ,आर्थिक परिस्थितीत आपण जन्म घेतो त्यावर मोठ्या प्रमाणात आपली मानसिक सुरक्षिता अवलंबून असते.आपली नाती ,कुटुंब,मित्रपरिवार यावर आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते.
आघात म्हणजे काय ? “आघात” ह्या मराठी शब्दाला इंग्रजीत Trauma असे म्हटले जाते. आघात बाबत मानसशास्त्रीय व्याख्या करायची म्हटल्यावर..मानसिक आघात म्हणजे अपघात,गुन्हा ,नैसर्गिक आपत्ती,शारीरिक आणि भावनिक अत्याचार,दुर्लक्ष, हिंसाचार अनुभवने किंवा पाहणे, प्रिय व्यक्तीचा मृत्यु,युद्ध आणि इतर भयानक घटनेला होणारा भावनिक प्रतिसादम्हणजे आघात . घटनेनंतर लगेचच ,धक्का आणि नकार हे सामान्य असतात.
आघाताचे प्रकार कोणते ?
बालपणीचा आघात
सामूहिक आघात
पिढीजातआघात
नैतिक दुखापत
वांशिक आघात
ह्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती घेऊ या…
बालपणीचा आघात- लहानपणी काही आघात अनुभवाला असेल तर या आघताचा परिणाम प्रौढावस्थेत तुम्हाला मानसिक आरोग्य समस्या येण्याची शक्यता असू शकते.ह्या झालेल्या आघातावर लहानपणी काही उपाययोजना केल्या नाही तर मोठेपणी ह्या आघाताचे परिणाम भोगावे लागतात.त्यामुले वेळीच ह्यावर उपाययोजना करने आवश्यक असते.
सामूहिक आघात :- सामूहिक आघात म्हणजे एखादी आघातजन्य घटना ही एकाच वेळी मोठ्या संख्येने लोकांसोबत घडते.याचा अर्थ असा नाही की ज्यानी ही घटना अनुभवली आहे त्याना त्याबद्ल सारखीच भावना निर्माण होते.प्रत्येकजण अजूनही आपापल्या पद्धतीने त्याचा सामना करतो. सामूहिक आघात बाबत उदाहरण द्यावयाचे म्हटले तर ; भूकंप ,महामारी,पुरग्रस्त परिस्थिति आतंकी आक्रमण इत्यादि
पिढीजात आघात :- पिढ्यान पिढ्या होणारा आघात हा एक प्रकारचा आघात आहे जो कुटुंब ,संस्कृति किंवा गटाच्या पिढ्यानपिढ्या अनुभवला जातो .भूतकाळ मध्ये घडलेल्या घटनांचा आघाताचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.पण ते कसे होते हे नेहमीच स्पष्ट नसते.संशोधक म्हणतात की आघाताचा परिणाम जनुकावर होतो. पं आपण जय वातवरणात वाढतो त्या वातावरणावर आघाताचा परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.
नैतिक दुखापत :- प्रत्येक व्यक्तीला / मनुष्याला नैतिकता,मुल्ये किंवा श्रद्धा ह्या गोष्ठी आयुष्यात खुपच महत्वाच्या असतात.आणि ह्या गोष्टीना नकारात्मतक पद्धती ने आपल्या देनंदिनी मध्ये आणले जाते तेव्हा त्या व्यक्तिचे नैतिक दुखापत होते.नैतिक दुखापत होण्याची काही कारणे:- खराब सुरक्षा पद्धती , सर्वाना समानतेच्या नावाखाली कामाच्या ठिकाणी सर्कार किंवा संस्थेकडून पुरवल्या जाणाऱ्या संसाधनांचा अभाव,लोकांचे हिताचे नसलेले नियम,अनैतिक वर्तन या अश्या कारणामुळे आघाताचा परिणाम समाजाकडे आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलतो.
वांशिक आघात :वंशवाद ही एक गोष्ट मनुष्याच्या मनावर आणि शरीरावर परिणाम करत असते.आणि ह्यालाच वांशिक आघात असेही म्हटले जाते .वांशिक आघात ही एक हिंसा किवा अपमानासह वर्णद्वष यांच्या अनुभवाची प्रतिक्रिया आहे. वांशिक आघात हा आंतरपिढ्याही जसु शकतो,म्हणजेच अनेक पिढ्यावर परिणाम होतो.जसे की गुलामगिरी, नरसंहार,ह्यानुसार सुद्धा वांशिक आघात होऊ शकतात.
आघाता मुळे मानसिक आणि शारीरिक परिणाम काय होतात ते पाहू या….
मानसिक परिणाम:- ताण तणाव ,झोपेच्या समस्या,निराशा,चिंता,भूख न लागणे,कामात लक्ष न लागणे ,उस्ताह कमी होणे ,एकटेपणा इत्यादि
आघातावर उपचार कसे केले जातात ..
औषधोपचार :- इतर मानसिक विकारांप्रमाणे आघात एखाद्या नकारात्मक घटने मुळे किंवा अनुभवामुळे होतो आणि विशिष्ट औषधांच्या मदतीने उपचार केले जाऊ शकतात.आपण हे लक्षात ठेवले पाहिजेकी सर्व आघाताना औषधांची आवश्यकता नसते.
समुपदेशन:- समुपदेशन ह्या प्रक्रियेतुन व्यक्तिला आघातावर मात करता येऊ शकते.त्यामध्ये सायकोथेरपी चा वापर करण्यात येतो.
सौ .रोहिणी भोसले –शेख चिकिस्तालयीन समाज सेवा अधिक्षक प्रादेशिक मनोरुग्नालय,येरवडा, पुणे
6 Comments
Khup Chan sagle points perfect Aj kal hey khup vadhle ahe jast mansik Mala khup bhavale
Chhan !
Madam Khup Chan, Keep shining.
Please add more topics on various diseases.
Very nice blog
Very nice subject to our life and good language
लेख खूपच छान आणि मुद्देसूद.